प्रहार जनशक्ती पक्षाच्या दौंड तालुका विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी सुमित निंबाळकर यांची निवड

सचिन आव्हाड,दौंड

प्रहार जनशक्ती पक्षाच्या दौंड तालुका विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष पदी सुमित राजेंद्र निंबाळकर यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष दौंड तालुका अध्यक्ष रमेश शितोळे यांच्या हस्ते सुमित निंबाळकर यांना निवडीचे पत्र देण्यात आले .

यावेळी दौंड तालुकाअध्यक्ष रमेश शिवाजी शितोळे ,उपाध्यक्ष वासुदेव प्रकाश गायकवाड ,महाराष्टू दारुबंदी कृती समितीचे अध्यक्ष मंगेश फडके ,संजय तुळशीराम भोसले, संदीप सुभाष सोनवणे, रफिक हुसेन सय्यद ,सरचिटणीस शैलेश भाऊसो शिपलकार , रामदास विठ्ठल फासगे, राहुल गोरखनाथ शेलार उपस्थित होते .

प्रहार जनशक्ती पक्षाची नुकतीच दौंड तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न झाली .यावेळी नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चु भाऊ कडू (मा. राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशावरून तसेच पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ व पक्ष प्रवक्ते अजय महाराज बारस्कर पूणे जिल्हा संघटक आणी नीरज कडू यांच्या सूचनेनुसार विविध पदाधिकारी नेमणुका करण्यात आल्या .

Previous articleउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकांचे लोकार्पण
Next articleसर्व प्रकारच्या कलावंतांसाठी विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे – आमदार अतुल बेनके यांची मागणी