कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोणीकंदमध्ये आरोग्य सर्व्हेक्षण मोहिम अंतर्गत तपासणी

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

लोणीकंद (ता.हवेली) येथे जिल्हा परिषद पुणे- पंचायत समिती हवेली- लोणीकंद ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र पेरणे व उपकेंद्र लोणीकंद यांच्या संयुक्त विद्यमाने घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी तसेच अॅन्टीजेन रॅपिड टेस्ट करण्यात आली. आरोग्य सर्व्हेक्षण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद , मा पंचायत समिती सदस्य सुभाष जगताप, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

जवळपास ८३ आरोग्य तपासणी टिमच्या माध्यमातून लोणीकंद गाव व वाड्यावस्त्यावर घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याची कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी केली आहे. यामध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून लोणीकंद गावातील सर्व ग्रामस्थ महिला भगिनी तरुण युवक यांच्या आरोग्य विषयक समस्यांचे निराकरण करत लक्षणे आढळल्यास अॅन्टीजेन रॅपिड टेस्ट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीकंद या ठिकाणी करण्यात आली. यामध्ये लोणीकंद गावातील १९८ व्यावसायिक बंधुची सक्तीची अॅन्टीजेन रॅपिड टेस्ट करण्यात आली आहे. यामधून संशयित कोवीड रुग्ण ५ असून त्यांना पुढील उपचारासाठी दाखल करण्यासाठी यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.

यावेळी पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाॅ हौदेकर मॅडम डाॅ इनामदार त्यांचे सहकारी शिक्षक वृंद तसेच स्थानिक पातळीवरील सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने एकुण ३४३७ कुटुंबातील १०७६३ नागरीकांचे सर्व्हेक्षण १४४ शिक्षक व १०० स्वयंसेवक यांच्या वतीने पुर्ण करण्यात आले.

यावेळी आरोग्य तपासणी सर्व्हेक्षण प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर भुमकर, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष जगताप, सरपंच सागर गायकवाड, माजी उपसरपंच गजानन कंद, माजी उपसरपंच रविंद्र कंद, सोहम शिंदे, संतोष झुरुंगे, विशाल कंद, दिनेश शिंदे, राजेंद्र झुरुंगे, माऊली कंद, गणेश झुरुंगे, नरेंद्र मगर , उमेश कंद, राजु ढगे, विष्णू खलसे, मंदाताई कंद, शैलजा कंद, शितल कंद, जयश्री झुरुंगे, सुरेखा होले, पुजा खलसे, संगिता शिंदे, अश्विनी झुरुंगे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जय कंद, मराठा महासंघाचे अध्यक्ष राहुल शिंदे, सोमनाथ शिंदे, स्वप्निल कंद, ग्रामविकास अधिकारी बोरावणे आदी उपस्थित होते. तसेच प्रत्येक वार्डातील जवळपास १०० कार्यकर्त्यांनी सर्व्हेक्षण मोहिमेत सहभाग घेतला आहे.