पत्रकार प्रमोद झालटे यांच्यावर हल्ला करणाऱ्या वर कडक कारवाई करण्याची पुरोगामी पत्रकार संघ दौंड ची मागणी

Ad 1

दिनेश पवार,दौंड

धुळे जिल्ह्याचे पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव प्रमोद झालटे याच्यावरती हल्ला करणाऱ्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी पुरोगामी पत्रकार संघ दौंड तालुक्याच्या वतीने दौंड पोलीस निरीक्षक व दौंड तहसीलदार यांना निवेदन सादर करून करण्यात आली .

कोरोना च्या पार्श्वभूमीवर जनतेला योग्य ती माहिती तत्काळ मिळावी यासाठी पत्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वत्र तप्तर राहून बातम्या संकलनाचे काम करतात,आशा बिकट परिस्थितीत योग्य ते अपडेट पत्रकार पुरवत राहतात अशावेळी पत्रकारांची स्तुती करण्यापेक्षा त्यांच्यावर हल्ले केले जातात, ही बाब निंदनिय आहे, आशा गोष्टी भविष्यात घडू नये यासाठी शासनाने कठोर पाऊल उचलावे अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळीपुरोगामी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र सोनवलकर, पुणे जिल्हा संघटक दिनेश पवार, दौंड तालुका अध्यक्ष सुभाष कदम,कायदेविषयक सल्लागार विजयकुमार जोजारे, सचिव हरिभाऊ क्षीरसागर,संघटक रमेश चावरीया,खजिनदार कैलास जोगदंड, सह,संघटक सुरेश बागल,सह खजिनदार विठ्ठल शिपलकर,कला नाट्य विभाग उपाध्यक्ष सुनील नेटके उपस्थित होते