माहिती सेवा समितीने केल्या रेशनिंग वाटप, महसुल तक्रारी बाबत गाव बैठकांना सुरवात

वाघोली-महसूलच्या सततचा होणाऱ्या रेसनिंग व नोंदी संदर्भातील तक्रारी जाणून घेण्यासाठी माहिती सेवा समितीच्या माध्यमातून हवेली तालुक्यातील गावा गावात बैठक घेण्यास सुरुवात केली आहे .आज त्याची सुरुवात सांगवी सांडस या गावापासून करण्यात आली. त्या ठिकाणी खूप नागरिकांच्या रेसिंग बाबत तक्रारी होत्या त्यामध्ये गेले ६ महिन्या पासून कागदपत्रे देऊन त्याबरोबर तीनशे रुपये देऊन सुद्धा एकाही नागरिकांचे रेशनिंग कार्ड ऑनलाईन झाले नाही. अनेक नागरिकांना अन्नसुरक्षेचे धान्य मिळत नाही , दुकानदार ठराविक वेळेतच धान्य देत आहे ,नवीन रेशसिंग कार्डधारकांना धान्य मिळत नाही ,अश्या खूप तक्रारी त्या ठिकाणी नागरिकांकडून आल्या त्या ठिकाणी संबंधित सर्व तक्रारदार नागरिक उपस्थित होते.

त्या ठिकाणी संबंधित रेशन दुकानदार गजरे यांना समक्ष बोलून सर्व नागरिकांच्या तक्रारी समजून घेतल्या त्याचप्रमाणे हवेलीचे तहसीलदार सन्माननीय सुनील कोळी साहेब ,महसूल नायब तहसीलदार भोसले साहेब ,त्याचप्रमाणे गाव कामगार तलाठी गवारे साहेब याच्याशी फोन वर चर्चा करुण संबंधित रेशनिंग दुकानदार गजरे त्यांच्याकडे असलेली नाव्ही सांडस, पिंपरी सांडस, सांगवी सांडस, या तीन गावांचे रेशनिंग संबंधित ज्या तक्रारी आहेत या तक्रारींचा निपटारा येत्या १० दिवसात संबंधित अधिकारी त्यांच्याकडे कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तो सोडून देण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. त्याचप्रमाणे रेसिंग बाबत तक्रारी असणाऱ्या नागरिकांनी तिन्ही गावातील गाव कामगार तलाठी यांना भेटून त्या ठिकाणी आपल्या तक्रारी सांगून आपली रेशनिंग कार्ड बाबतची अपूर्ण कामे पूर्ण करून घेण्याच्या सुचना माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी दिल्या

ई सेवा केंद्रामध्ये सुद्धा नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये लुटमार होत असल्याबाबत तक्रारी आल्या त्या ठिकाणी सकाळी कागदपत्रे दिली तर संध्याकाळी रेसनिंग कार्ड मिळते परंतु त्यासाठी ५००० हजार रुपये ई सेवा केंद्र वाले घेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला त्यामुळे तिथून पुढच्या काळामध्ये ज्या ई सेवा केंद्राची तक्रार येईल ते ई-सेवा केंद्र बंद करण्याबाबत संबंधित तहसीलदार यांना निवेदन देण्यात येईल अशा प्रकारचे ईशारा वारघडे यांनी दिला . हवेली तालुक्यामध्ये हजारो नागरिकांनी गेल्या ६ महिन्यापासून रेशनिंग कार्ड ऑनलाइन होण्यासाठी प्रत्येकी तीनशे रुपये प्रमाणे पैसे संबंधित रेशन दुकानदार त्यांच्याकडे कागदपत्रे देऊन जमा केले आहेत.

परंतु गेल्या सहा महिन्यात एकही रेशनिंग कार्ड ऑनलाइन झालेले दिसत नाही .त्यामुळे त्या ठिकाणी काही कोटी रुपये भ्रष्टार झालेला आहे. त्याची चौकशी करुण समंदितावर कारवाई झाली पाहीजे .अशी सुचना सांगवी सांडस गावचे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे या भ्रष्टाचारामध्ये जे जे अधिकारी सामील आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात माहिती सेवा समितीच्या माध्यमातून प्रयत्न करनार असल्याचे वारघडे यांनी सांगितले त्याठिकाणी भाऊसाहेब शिंदे, विकास तळेकर ,मोतीराम लबडे ,विठ्ठल निळक, रवींद्र लोले , ज्यांनी या बैठकीचे आयोजन केले ते माहीती सेवा समीतीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे ऊपस्थीत होते .

Previous articleनारायणगाव, येडगाव व धनगरवाडी परिसरात निसर्ग कोपला
Next articleकानगावं येथे भिल्ल समाजाला मिळाली हक्काची जागा