कृषिकन्या हर्षदा कोकणेकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Ad 1

राजगुरूनगर-महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत सेवा संस्कार संस्थेच्या मालदाड (ता. संगमनेर) येथील श्रमशक्ती कृषी महाविद्यालयातील हर्षदा कोकणे हिचे कृषी जागरुकता व औद्योगिक कार्यानुभव व कार्यक्रम २०२० या अभ्यास कोर्ससाठी पाडळी ( ता.खेड ) येथे आगमन झाले होते .

या कार्यक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांना माती परीक्षण,पशुधनाची घ्यावयाची काळजी पिकावरील कीड व रोग नियंत्रण फवारणी करताना घ्यावयाची काळजी स्वच्छ दूध उत्पादन , हिरवळीच्या खताचे फायदे,मोबाईल अँप्स चा शेतीमध्ये वापर बुरशीनाशक बोर्डो मिश्रण कसे बनवायचे व त्याचे फायदे याबद्दल शेतक-यांना कृषीकन्या हर्षदा कोकणे हिने मार्गदर्शन केले.

या कृषिकन्येला ग्रामीण कृषी जागरूक व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२० या उपक्रमासाठी श्रमिक उद्योग समूहाचे अध्यक्ष तसेच सेवा संस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष साहेबरावजी नवले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए एल हारदे सर,कार्यक्रम समन्वयक प्रा.एन पी तायडे,कार्यक्रमचे अधिकारी प्रा.एस एम कानवडे, प्रा.सौ.पी एस राऊत,प्रा.एन बी शिंदे, प्रा.के जी नवले,प्रा.टी डी साबळे,प्रा.व्ही डी वाळे आदींचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे.

तसेच विद्यमान जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे आणि पाडळी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी तसेच शिक्षकांचे देखील वेळोवेळी सहकार्य लाभले.याकामी निवडलेले शेतकरी पांडुरंग बापू कोहिनकर आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी वेळोवेळी चांगल्याप्रकारे सहकार्य केले.