देऊळगाव राजे मध्ये कृषिदूताकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Ad 1

दिनेश पवार,दौंड

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत,
शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय चिपळूण येथे शिकत असलेले कृषिदूत संकेत बुऱ्हाडे याने देऊळगाव राजे या आपल्या गावी कोरोना परिस्थितीत योग्य काळजी घेऊन ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम राबविला,रावे उपक्रमाअंतर्गत 3 महिने हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे.

यामध्ये शेतकऱ्यांपर्यंत नवीन शेती माहिती ची प्रसारण करणे,तसेच आधुनिक खते,बी,बियाणे,तंत्रज्ञान यांची योग्य माहिती देऊन आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी,कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न कसे घ्यावे याबाबतीत या कृषी दूताने मार्गदर्शन केले आहे, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शाश्वत शेती बद्धल माहिती देऊन सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्यासाठी त्यातील फायदे व सखोल माहिती या उपक्रमात देण्यात आली.

तसेच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा घटक म्हणजे शेतीवरती आधारित असणारा जोड धंदा याबाबतीत ही या उपक्रमात माहिती देण्यात आली, यावेळी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना संकेत बुऱ्हाडे म्हणाला की देऊळगाव राजे व परिसरातील रेगुर मृदा,हवामान तसेच भीमा नदीवरील,तसेच विहीर,कूपनलिका या द्वारे होणारे जलसिंचन कृषी मलासाठी असणारी दळणवळण व्यवस्था यामुळे येथे आधुनिक शेतीला चांगली चालना मिळू शकते गावातील शेतकऱ्यांनी व ग्रामपंचायत ने चांगले सहकार्य या उपक्रमास दिल्याचे मत यावेळी संकेत ने व्यक्त केले.