खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम

नारायणगाव (किरण वाजगे)

शिरुर लोकसभेचे खासदार संसदरत्न डाॅ.अमोल रामसिंग कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त नारायणगाव येथील कोविड केअर सेंटरला आज वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा उपकरण भेट देण्यात आले.

खासदार डॉ अमोल कोल्हे तसेच जगदंब प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य व बंधन बँक ली. यांचे संयुक्त विद्यमाने खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळुन नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालय कोवीड केअर सेंटरला चिकित्सा उपकरण देण्यात आले.
सध्या कोविड आजाराने सर्वत्र आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे रुग्णांच्या उपचारामधे मदत होण्यासाठी ईड्युटेंनमेंट उपकरण ज्याद्वारे रुग्णांच्या २२ प्रकारच्या तपासण्या अल्पावधीतच पुर्ण करुन उपचार जलद गतीने होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे हाय फ्लो ऑक्सिजन उपकरणाद्वारे श्वसनास त्रास होत असलेल्या रुग्णांस तातडीने ऑक्सिजन पुरवठा होणेकामी हे उपकरण रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे.

खासदार डॉ कोल्हे यांनी सामाजिक बांधीलकी जपुन एक रुग्णोपयोगी कार्य करुन आपला वाढदिवस साजरा करुन एक आदर्श निर्माण केला आहे.हे उपकरण आज दि. १८ रोजी ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णालयाचे प्रतिनीधी डाॅ.योगेश आगम यांचेकडे जगदंब प्रतिष्ठाणचे प्रतिनीधी सागर रामसिंग कोल्हे यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आले.

यावेळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर, तहसिलदार हनूमंत कोळेकर,तालुका वैद्यकिय अधिकारी डाॅ.उमेश गोडे, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, दिलीप कोल्हे, आदित्य मराठे, गणेश वाजगे, मुकेश वाजगे, संतोष केदारी, राहुल गावडे, तुषार डोके, अतुल आहेर, आशिष हांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleजुन्नर तालुक्यात चंदन चोराला मुद्देमालासह अटक
Next articleखासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश बोत्रे युथ फाॅडेशनच्या वतीने वैद्यकीय साहित्याचे वाटप