Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिनेश पवार,दौंड
जगामध्ये कोरोनाचे सावट असताना शेतकऱ्यांना गेल्या सात महिन्यापासून शेतकरी हे बीबीयानेपासून वंचित असून.चढ्या भावाने बि बियाणे, खते यामध्ये देखील काळा बाजार होऊन चढ्या भावाने शेतकऱ्यांना बी बिया घ्याव्या लागल्या.त्यातून अस्मानी संकटामुळे सोयाबीन,तुरसारखी पीक ही वाया गेली असून.यामध्ये कांदा एकमेव पिक शेतकऱ्यांना नकदी पीक उपलब्ध असताना केंद्र सरकारने जाणूनबुजून अडचणीत आणले,कांद्याचे उत्पादन करणारे शेतकरी गरीब आहेत.
कोरोनामध्ये संपूर्ण देशाला सावरण्याचे काम शेतकऱ्यांनी केले.देशाला अन्नधान्य भाजीपाल्याची कमतरता भासू दिली नाही.जगभरातून कांद्याला मोठी मागणी असताना कांद्याची निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.हजारो टन कांदा निर्यातीसाठी पडून आहे.देशांतर्गत दर कोसळल्यावर कांदा फेकून द्यावा लागतो .परंतु कांद्याला चांगला भाव मिळत असताना असा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.अचानकपणे निर्यातबंदी केल्याने भारताच्या निर्यातीला मोठा फटका बसू शकतो याचा विचार केंद्र सरकारने करावा व ही निर्यातबंदी हटवावी. शेतकऱ्यांवर कांदा निर्यातबंदी चा जो घाट घातला आहे तो त्वरित थांबवावा त्यामुळे सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी.अशी मागणी काँग्रेस आय,पीपल्स रिपब्लिकन पार्टी,स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी केली.

अमित सोनवणे(पी आर पी.पुणे जिल्हा युवक अध्यक्ष),राजू जाधव(दौंड तालुका अध्यक्ष),संजीव आढाव(पुणे जिल्हा उपाध्यक्ष),यादव जाधव(पुणे जिल्हा संघटक) तसेच कांग्रेस चे हरेश ओझा(दौंड शहराध्यक्ष),अतुल जगदाळे (तालुका युवक अध्यक्ष),महेश जगदाळे(उपाध्यक्ष दौंड शहर),विठ्ठल शिपलकर (सरचिटणीस),व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजभाऊ कदम व आदी मान्यवरांनी आंदोलनात सहभाग नोंदवला.
Download WordPress Themes Nulled and plugins.