अखिल विश्व वारकरी परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी विश्वंभर महाराज वाळके यांची निवड

दौंड,दिनेश पवार

अखिल विश्व वारकरी परिषद च्या दौंड तालुका अध्यक्ष पदी प्रसिध्द रामायनाचार्य विश्वंभर महाराज आप्पासाहेब वाळके यांची निवड करण्यात आली,ही निवड पाच वर्षासाठी करण्यात आली आहे,वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करण्याबरोबरच समाजप्रबोधनातून सकल जनांचे कल्याण ही परिषदेची विचार धारा आहे, या विचार धारेला अनुसरूनच वाळके महाराजांचे कार्य असल्यामुळे ही निवड करण्यात आली आहे.

 वाळके महाराज सुप्रसिद्ध कीर्तनकार,प्रवचनकार तसेच रामायनाचार्य आहेत आपल्या ज्ञानातून कित्येक व्यक्तीना भक्तीची शिदोरी देऊन सकारात्मक परिवर्तन घडवण्याचे काम त्यांनी केले आहे, त्यांची सिद्धेश्वर वारकरी शिक्षण संस्था असून कित्येक विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची शिकवण वाळके महाराजांनी दिलेली आहे,परिसरातून या निवडीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

Previous articleदौंड मध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी भव्य रॅली  
Next articleकांदा निर्यातीवरील बंदी मागे घेण्यासाठी दौंडमध्ये पी आर पी, आय काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन