प्रेमसुखजी कटारिया यांच्या वाढदिवसानिमित्त कामगारांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

Ad 1

दौंड,दिनेश पवार

 दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व जेष्ठ नगरसेवक मा. प्रेमसुखजी कटारिया यांचा वाढदिवस आज दौंड शहरांमध्ये वेगवेगळ्या उपक्रमानी साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे रा.प. दौंड आगारातील कामगारांना मास्क व  सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.

यावेळी नागरिक हित संरक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश भैय्या कटारिया, हरेश रांभिया,ज्ञान संकल्प सामाजिक संस्थेचे  संस्थापक अध्यक्ष सदाशिव रणदिवे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस संघटनेचे विभागीय सचिव रमेश शिंदे, राज्य सहसचिव दत्तात्रय तिगोटे, सचिव संतोष वारे, पांचाळ ज्ञानेश्वर, संजय शिंदे, गणेश जागडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते यांच्या हस्ते आगारातील सर्व चालक वाहक सहाय्यक व इतर कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर मोफत वाटप करण्यात आले.

 यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले व कामगारांनी आभार व्यक्त करून माननीय प्रेमसुख कटारिया यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा दिल्या