भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा “कोव्हिड योद्धा” गौरवपत्र देऊन सन्मानित

राजगुरूनगर- मंडल अधिकारी खेड व गाव कामगार तलाठी सजा खेड ,वाकी बु।। सांडभोरवाडी यांना भाजपा महिला मोर्चाच्या पुणे ग्रामीणच्या वतीने “कोव्हिड योद्धा” म्हणून गौरवपत्र देऊन सन्मानित  करण्यात आले.भाजपा महिला मोर्चाच्या पुणे ग्रामीणच्या वतीने  राजगुरूनगर शहरातील सर्व पदाधिकारी यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला.

खेड येथील महसूल विभागाच्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला अँड प्रितम शिंदे संघटन सरचिटणीस भाजप पुणे जिल्हा ,बाळासाहेब कहाणे (शहराध्यक्ष राजगुरूनगर शहर) , सौ संगीता जगताप जिल्हा  सचिव,नगरसेविका सौ संपदा सांडभोर ,नगरसेविका सौ. सुरेखाताई शोत्रीय ,योगेश पवार शहर सल्लागार , निलेश जोशी सरचिटणीस , सौ दीप्ती कुलकर्णी महिला आघाडी शहरअध्यक्ष ,सौ.पल्लवी जोशी , विजय कुलकर्णी कार्यकर्ते , नितीन शहा भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष, शैलेश रावळ उपाध्यक्ष, प्रविण वाईकर कोषाध्यक्ष, संदीप जगताप , इतर पदाधिकारी आदींसह  कार्यकर्ते उपस्थित होते.

 भाजपा महिला मोर्चा पुणे ग्रामीण यांच्या वतीने गुरुवारी  खेड येथे रक्षाबंधन व कोव्हिड योद्धा गौरव कार्यक्रम पार पडला.

 यावेळी खेड मंडळ सजातील सर्कल श्रीमती घुमटकर मॅडम , राजगुरूनगर सजाचे तलाठी लंघेसाहेब  ,वाकी बु।। तलाठी मुंगारेसाहेब तसेच  सौ मनीषा राऊत तलाठी यांना कोव्हिड योद्धा म्हणून गौरवपत्र देऊन गौरवण्यात आले. उपस्थित पदाधिकारी,पत्रकार व महसूल कर्मचारी  यांना महिला मोर्चाच्या पदाधिका-यांनी ओवाळून त्यांना राख्या बांधल्या.

Previous articleवाकळवाडीत बैलपोळा साधेपणाने साजरा
Next articleप्रेमसुखजी कटारिया यांच्या वाढदिवसानिमित्त कामगारांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप