अवघ्या…तीन महिन्याच्या बाळाने केली कोरोनावर मात

Ad 1

चाकण,बाबाजी पवळे– पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खालुम्ब्रे येथील दोन आठवड्यांपूर्वी एका तीन महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली होती. परंतु आता दोन आठवड्यानंतर तीन महिन्यांच्या कोरोना पॉझिटिव्ह बाळाने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. हे बाळ आता पूर्णपणे बरं झालं असून त्याला डिस्चार्जही देण्यात आला आहे.

या बाळावर आणि त्याच्या आईवरही रूग्णालयात उपचार सुरु होते. कोरोना झालेल्या घरातीलच कौटुंबिक सदस्यांकडून बाळाला कोरोनाची लागण झाली होती. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोत्रे व त्यांच्या कुटुंबाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी आई आणि बाळ दोघेही रुग्णालयात आले होते. या दोघांचीही दोन वेळा कोरोना चाचणी करण्यात आली होती. चाचणीमध्ये आईचे व बाळाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. तदनंतर दोघांनाही उपचार सुरू करण्यात आले बाळाच्या आईनेही सर्व आवश्यक ती काळजी घेतली.

बाळाला तापाशिवाय दुसरी कोणतीच समस्या नव्हती. त्यामुळे सुरुवातीला त्याला पॅरासिटामोल देण्यात आलं.
परंतु आईच्या दुधापासून प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे बाळावर इतर कोणतेही उपचार करण्यात आले नाहीत आणि तो कोणत्याही इतर औषधांविना बरा झाला.मंगळवारी बाळाची आणि आईची चाचणी करण्यात आली. मात्र दोन्ही चाचण्यांमध्ये दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.बाळाच्या कुटुंबातील सदस्य गणेश बोत्रे व अन्य खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.