वाघोली येथील भारतीय जैन संघटना विद्यालयात हिंदी दिवस संपन्न

गणेश सातव, वाघोली

वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या विद्यालयात ऑनलाईन पद्धतीने गुगल मिटच्या सहाय्याने हिंदी दिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी,उपप्राचार्य दिलीप देशमुख,पर्यवेक्षक पांडूरंग पवार,शिक्षिका अनिता चोरडिया,प्रभाकर सोनावणे,पूनम सिंह,भारती गुरव आदी शिक्षक उपस्थित होते.इयत्ता ८वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर सोनवणे यांनी केले,तर हिंदी भाषेचा इतिहास अनिता चोरडिया यांनी सांगितला.या कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित हिंदी कविता तथा मनोगते सदर करून सहभाग नोंदविला.कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उपप्राचार्य दिलीप देशमुख व पर्यवेक्षक पांडूरंग पवार यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य संतोष भंडारी यांनी हिंदी भाषेचे महत्व सांगून आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये मातृभाषेबरोबरच इतर भाषा सुद्धा किती महत्वाच्या याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.कोरोनाचे काळात शाळा बंद असूनसुद्धा ऑनलाईन पद्धतीने हिंदी दिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन केलेबद्दल त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्याना धन्यवाद दिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सिद्धी हरगुडे व कु.अवंतिका राऊत यांनी केले तर आभार स्नेहल मांजरे हिने मानले.

Previous articleराज्य शासनाने पत्रकारांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत द्यावी- एस.एम.देशमुख
Next articleशेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने मागे घ्यावी खा.डॉ. अमोल कोल्हे