कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार;बंदी तात्काळ उठवावी – महेश तपासे

पुणे – अमोल भोसले

कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार आहे. केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे ती तात्काळ उठवण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये (हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणूकाआधी) घातलेली निर्यात बंदी आता मार्चमध्ये उठवली होती. त्यानंतर बरोबर सहा महिन्यात पुन्हा बंदी घालण्यात आली आहे. हे भाजप सरकार शेतकर्‍यांना परावलंबी ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महेश तपासे यांनी केला आहे.

शेतकर्‍यांनी ६० टक्के साठवलेला कांदा आधीच खराब झाला आहे आणि आता भाजप सरकारने निर्यात बंदी घातल्यामुळे शेतकर्‍यांना कांदा कवडीमोल भावाने विकण्याची वेळ येणार आहे. केंद्रातील भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे असेही महेश तपासे म्हणाले.

Previous articleकोरोना सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ चाकण च्या वतीने ऑक्सिमीटर ,थर्मामीटर ,सेंनिटायर ,मास्क, इत्यादी साहित्य नगर परिषदेकडे सुपूर्त
Next articleनरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने हडपसर मध्ये सफाई कामगारांना मास्क आणि सॅनिटायझर यांचे वाटप