कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे आपल्या हातात-सुनील महाडिक

दिनेश पवार,दौड

कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपणच आपली काळजी काळजी घ्यावी असे आवाहन दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.सध्या दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे आकडे फटाफट वाढत आहेत .संपूर्ण लॉक डाऊन हा काय प्रभावी उपाय राहिलेला नाही .कोरोना लागण होऊ नये म्हणून लस बाजारात येण्यासाठी आणखी काही महिने नक्की जाणार आहेत.

हॉस्पिटल मध्ये बेड ची उपलब्धता होत नाही . सर्वसामान्य जनतेस खाजगी रुग्णालयाचे बिल परवडत नाही .ज्याला शुगर कॅन्सर बीपी यासारखे पारंपारिक आजार आहेत .त्याला कोरणा चा धोका कित्त्येक पटीने आहे. पारंपारिक आजार असलेले व्यक्ती जवळजवळ प्रत्येक कुटुंबांमध्ये आहे. या सर्वांचे संरक्षण आपल्याला करायचे असल्याने व स्वतःच्या कुटुंबातील इतर व्यक्तींची ही काळजी घेणे आवश्यक असल्याने व आपल्याला मानसिक आर्थिक ताणातून जर वाचायचे असल्याने बाबांनो खालील नियम पाळा .

दररोज साबणाने दिवसातून दोन चार वेळा हात धुवा,सॅनिटायजर चा वापर करा .तोंडाला सदासर्वदा स्वच्छ मास्क ठेवा एकमेकांपासून सामाजिक अंतर ठेवून वागा .समारंभ व सामाजिक कार्यात गर्दीत मिसळून नका .हे सर्व नियम आपण पाळले नाही तर आपण या रोगाचा प्रादुर्भाव समाजामध्ये करू शकतो आणि आपल्या कुटुंबाला धोक्यात टाकू शकतो. हे नियम स्व इच्छेने ने कोणी पाळत नसल्यामुळे पोलीस दररोज विना मास्क फिरणाऱ्या लोकांच्यावर कारवाई करत आहे .दोन वेगवेगळ्या कुटुंबातील लोक वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीवर आलेली असल्याने व ते एका मोटारसायकलवर फिरल्याने निश्चितपणे सामाजिक अंतराचे उल्लंघन होते व कोरोना लागण होते त्यांच्यावरही आता पोलिसांनी कारवाई करणे सुरू केले आहे. पोलिसांची ही कारवाई काही लोकांना खटकत आहे त्यामुळे काही लोक पोलिसांना त्यांच्या इतर कार्याची जाणीव करून देतात पोलीस त्यांची दररोजची इतर कामे करून हे अधिकची कामे करत आहेत .त्यामुळे पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून कोरोना परिस्थितीवर ते करत असलेल्या कामाबद्दल त्यांचा आत्मविश्वास कमी करू नये.
आता समाजापेक्षा स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही कुटुंबाची काळजी घेतली तर समाजाची काळजी आपोआप घेतली जाईल तुम्ही जर नियम उल्लंघन करून तुमचे कुटुंब धोक्यात घालत असाल तर कोणतेही आंदोलन करून तुमचे नुकसान भरून निघणार नाही .आणि आपल्या या यावेळेस कुणीही उभे राहणार नाही .म्हणुन आपणच आपले तारण हार म्हणून नियम पाळूनच सगळ्या गोष्टी करा .वरील नियम जर पाळले तर मी आपणास हमी देतो कोरोना तुमच्याजवळ सुद्धा येऊ शकत नाही कोरोना रोगाबद्दल अनेक लोक अनेक सिद्धांत मांडतात कोण म्हणतो कोरोना रोगात काही होत नाही .करोना एक आंतरराष्ट्रीय साजीस आहे. कोरोना ने काय थोडासा थंडी ताप येतो .तो इतर थंडी ताप सारखा असतो. परंतु मी आपणा सर्वांना हे सांगीन की विषाची परीक्षा घेऊ नका .

सर्वसामान्य घालून दिलेले नियम पाळा जोपर्यंत ठोस उपाय मिळत नाही तोपर्यंत आपण कोरोना बाबत सतर्कता पाळावी हाच त्याला प्रभावी उपाय आहे.

आपल्या कुटुंबातील बहुतांश महिलावर्ग कुठेही सार्वजनिक ठिकाणी चहा नाश्ता करत नाहीत तंबाखूचे सेवन करून सार्वजनिक जागी थुंकी टाकत नाहीत कामाशिवाय घराबाहेर पडत नाहीत कुठेही टोळक्‍याने फिरत नाहीत हा आदर्श कुटुंबातील पुरुष मंडळीसुद्धा घेऊन कोरणा रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी महिलांना गुरु समान मानावे व स्वतःवर बंधने घालून घ्यावे यामुळे निश्चितपणे कोरोना दूर निघून जाईल म्हणून तर रोज घरातच चहा नाश्ता पाणी घ्या तंबाखू बिडी सिगारेट सोडून द्या दारू अड्ड्यावर जाऊ नका पत्ते खेळू नका या गोष्टी करोना काळात सर्व नाशास कारणीभूत होऊ शकतात.

ह्या सर्व गोष्टींचा मोहापासून दूर रहा पोलीस म्हणून आम्ही आमचे जेवढे शक्य होईल तेवढे कर्तव्य करणार आहोत फक्त पोलिसांच्या कारवाईस आपण सकारात्मक प्रतिसाद द्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळेल असे कृत्य करू नका नियमांचे उल्लंघन फक्त एक टक्का लोक करतात आणी बाधित मात्र आपण सर्वजण होतो.उद्यापासून सर्व दुकानदारांना विनंती आहे दुकानासमोर सामाजिक अंतर रहावे म्हणून मार्किंग करून घ्यावी किंवा सर्कल करावेत त्यामुळे लोक त्यावर येऊन उभे राहतील.सर्वांनी काळजी घ्यावी,नियम पाळावे असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.

Previous articleरायरेश्वर आणि रोहीडा किल्ल्यांच्या प्रलंबित कामांच्या संदर्भात पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
Next articleखेड तालुक्यात घरोघरी जाऊन कोरोनाची चाचणी-आमदार दिलीपराव मोहिते