वाघोलीत फुटपाथचे खोदकाम नागरिकांमध्ये असंतोष

Ad 1

वाघोली / प्रतिनिधी

वाघोली (ता. हवेली) येथे गेल्या काही दिवसापासून मोठा गाजावाजा करत पीएमआरडी च्या माध्यमातून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी व लोकांना चालण्यासाठी सुमारे अकरा कोटी रुपये खर्च करून पुणे-नगर महामार्गावर वाघेश्वर मंदीर ते भावडीफाटा हे 1300 मीटर रस्त्याचे आणि फुटपाथ चे काम करण्यात आले. परंतु आता हे फूटपाथचे काम पूर्ण होऊन सहा महिने होत नाही तेच पुन्हा नगरकडून पुणे रोडच्या बाजूने बाजार तळा शेजारी, आव्हाळवाडी फाट्याजवळ फुटपाथ खोदून त्या ठिकाणी केबल टाकण्याचे काम सुरू असल्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांकडून जमा केलेल्या कर रुपी पैसाची ही अशी उधळपट्टी होत आहे.त्यामुळे करोडो रुपये खर्च करून केलेले काम लगेच उखडल्याने पीएमआरडीच्या कार्यशैलीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. अधिच हे काम सुरु असताना पीएमआरडी आणि ठेकेदार यांच्याकडून हे काम निकृष्ट दर्जाचे आणि कमी अधिक साइजमध्ये करण्यातआले तर काही ठिकाणी गटार लाईनच्या वरतीच फुटपाथ करण्यात आले आहे.आधीच काही ठिकाणी कामाचा दर्जा व्यवस्थित नसल्याने अनेक ठिकाणची फुटपाथचे गटू निघून गेले आहेत तर काही ठिकाणी गटू टाकलेच नसल्याचे समोर आले आहेत. त्यातच आता पुन्हा केबल टाकण्यासाठी हे फूटपाथ उखडल्याने जनतेच्या पैसाची नासाडी होताना दिसत आहे, संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या अर्थकारणामुळे सर्वसामान्य जनतेच्या कर रुपी पैशाची अशी विल्हेवाट लावली जाते तरी संबंधित अधिकारी स्थानिक राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते व आमदारांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ज्या प्रमाणे शिक्रापुर येथे रस्ताच्या कडेला बेकायदेशीर पणे खोदकाम करणाऱ्यावर पीएमआरडीए ने गुन्हा दाखल केला त्या प्रमाणे येथे देखील पीएमआरडीए ने तत्परता दाखवत तात्काळ गुन्हा दाखल करावा .अन्यथा माहिती सेवा समितीच्या माध्यमातून आंदोलन उभारण्यात येइल.
चंद्रकांत वारघडे (माहिती सेवा समिती )