नाणेकरवाडीमध्ये कोरोनाचे महानिदान शिबीर

चाकण-कोरोनाचे  चाकण परिसरात रोज रूग्ण सापडत आहेत त्या अनुषंगाने प्रशासनाला नेहमीच सतर्क राहावे लागत आहे. यावर उपाय म्हणून चाकणच्या नाणेकरवाडीमध्ये कोरोनाचे महानिदान शिबीर घेण्यात आले.यावेळी करंजीविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आणि नाणेकरवाडी ग्रामपंचायतीच्या सौजन्याने महानिदान शिबिर घेण्यात आले.या शिबिरात शिक्षक ,आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीने जवळजवळ सहा हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले.

या सर्वेक्षणात 60 वर्षांवरील 827 लोक (डायबेटीस ब्लड प्रेशर चा त्रास असणारे) सापडले.यातले 63 लोक लक्षणयुक्त सापडले त्यांची अँटिजेंन चाचणी केली असता 16 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले.कोरोनाबाधितांपैकी 13 जणांना महाळुंगे कोविड सेंटरला पाठवले असून 2 जणांना होम क्वारंटाईन केले आहे तर एक पेशंट पुढील उपचारासाठी चांडोली आरोग्य केंद्रात पाठवण्यात आल्याचे करंजविहिरे आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.जयश्री महाजन यांनी सांगितले.संपूर्ण शिबीर वैद्यकीय अधिकारी डॉ.जयश्री महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

या शिबिरासाठी सहाय्यक वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ शाम बहाकर,डॉ गौरी गावडे,डॉ तनुजा चौधरी,डॉ मोहिते यांनी काम पाहिले तसेच चाकण बिटमधील विविध प्राथमिक शाळांचे शिक्षक,आरोग्य कर्मचारी या सर्वेक्षणात सहभागी झाले होते.कुरुळी केंद्राचे केंद्रप्रमुख हिरामण कुसाळकर तसेच नाणेकरवाडी शाळेच्या मुख्याध्यपिका लक्ष्मी दाते,संदिप नाणेकर आणि ग्रामपंचायतीचे विशेष सहकार्य लाभले.

Previous articleपश्चिम महाराष्ट्र पुणे विभागीय अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या अध्यक्षपदी ह.भ.प.आनंद महाराज तांबे यांची निवड
Next articleवाघोलीत फुटपाथचे खोदकाम नागरिकांमध्ये असंतोष