मंचर बसस्थानकावरून विवाहित महिला बेपत्ता

Ad 1

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

घोडेपिंपळगाव ता.आंबेगाव येथील 24 वर्षीय विवाहित तरुणी कुणाला काहीही न सांगता मंचर येथील बसस्थानकावरून बेपत्ता झाल्याची फिर्याद विवाहित महिलेचे पती यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार बेपत्ता महिला व तिचे पती मंचर येथे दिनांक ११ रोजी खरेदीसाठी आले होते मात्र मंचर बंद असल्याने नवऱ्याने महिलेला स्टँडवर सोडून ते पुढील कामासाठी पाषाण येथे गेले होते. त्यानंतर ते सायंकाळी घरी आले असता त्यांची पत्नी घरी आली नव्हती त्यानंतर त्यांनी घरात विचारले असता घरच्यांनी ती घरी आलेले नाही असे सांगितले. त्यानंतर तिच्या मोबाईल वर संपर्क केला असता तो बंद लागला, तीचा मंचर, गावात, नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला असता ती सापडली नसल्याने ती बेपत्ता झाली असल्याची तक्रार तिच्या पतीने मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे. सदर घटनेचा तपास पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र हिले करत आहेत.

बेपत्ता महिलेचे वर्णन –

दमयंती अमित पोखरकर  (वय २४ ) रा.घोडे पिंपळगाव ता.आंबेगाव जि.पुणे, उंची पाच फूट, रंग गोरा ,अंगाने सडपातळ, केस काळे, अंगात निळ्या रंगाचा टॉप काळ्या रंगाची लेगीज, ओढणी, गळ्यात मणी मंगळसूत्र, पायात पैंजण, असा असून सदर तरुणी कुठे आढळल्यास मंचर पोलिस ठाण्याची संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

जाहिरात