जमिनीच्या वादातून माय लेकीला मारहाण

Ad 1

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

जाधववाडी ( रांजनी ) येथे जमीन नांगरणी करून न दिल्याच्या वादातून मुलीला व तिच्या आईला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात नऊ जणांविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रतीक्षा सुभाष जाधव यांची रांजनी जाधववाडी येथे जमीन असून दि.26/8/2020 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान त्याचा गावातील जमिनीचा व्यवहार झालेले धनराज विलास शिंदे हे ट्रॅक्टर घेऊन जमीन नांगरणी करण्यासाठी आला होता. शिंदे व जाधव यांचा जमिनीचा व्यवहार पूर्ण न झाल्याने फिर्यादीने तुझ्या वडिलांना घेऊन ये, ट्रॅक्‍टरने नांगरणी करू नको असे म्हणाली असता  धनराज विलास शिंदे यांनी फोन करून शांताबाई सहाधू शिंदे ,वैशाली विलास शिंदे, कैलास सहादू शिंदे, सुनिता कैलास शिंदे, शिरीष विलास शिंदे,गिरीश विलास शिंदे, युवराज कैलास शिंदे,प्रणव कैलास शिंदे,यांना बोलावून घेतले हे सर्वजण आल्यानंतर त्यांनी जमिनी नांगरण्यासाठी विरोध करणाऱ्या मुलीला शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी मुलीची आई साधना ही मधे आली असता तिलाही लाथा बुक्यांनी मारहाण करण्यात आली. यासंदर्भात प्रतिक्षा सुभाष जाधव हिने नऊ जणांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ईश्वर कदम करत आहेत.