प्रहार जनशक्ती पक्षाच्या दौंड तालुकाध्यक्षपदी रमेश शितोळे यांची निवड

दिनेश पवार,दौंड

प्रहार जनशक्ती पक्षाच्या दौंड तालुका अध्यक्ष पदी रमेश शितोळे यांची निवड करण्यात आली, शितोळे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात व्यसनमुक्ती चे अभियान राबविले असून कित्येक तरुणांना व्यसनमुक्त केले आहे, वेगवेगळ्या गावातील दारू बंद करण्यासाठी वेळ प्रसंगी उपोषण ही त्यांनी केले आहे, सर्वसामान्य व्यक्तीना त्यांचे हक्क व कर्तव्य मिळवून देणे,महराष्ट्रातील युवा पिढी व्यसनमुक्त करणे हे त्यांचे ध्येय आहे, व्यख्यान,जनजागृती, समाजप्रबोधन या माध्यमातून समाज परिवर्तनाची कास त्यांनी धरली आहे.

शितोळे यांच्या निवडीने गोरगरीब उपेक्षित दिव्यांग घटनाकांना न्याय मिळणार असून त्यांच्या निवडीबद्दल परिसरामध्ये कौतुक होत आहे. राज्यमंत्री बच्चू कडु यांच्या हस्ते प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालय पिंपरी चिंचवड, पुणे येथे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

यावेळे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अजय महाराज बारस्कर, पुणे जिल्हा संघटक निरज कडू , पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष नंदकिशोर जगदाळे , दारू बंदी कृती समितीचे अध्यक्ष मंगेश फडके उपस्थित होते . रमेश शितोळे गेली १० वर्षापासून दौंड तालुक्यात दारु बंदी साठी तसेच दौंड तालुक्यातील वेगवेगळ्या प्रश्नासाठी प्रयत्न करीत आहे .

हजारो तरुणांना व्यसनातून मुक्त केले आहे .त्यांनी २०१९ ची दोंड विधानसभा प्रहार जनशक्ती पक्षा कडुन लढविली आहे.पक्ष बळकटी गोरगरीब, दिव्यांगासाठी व पक्ष मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले.
तसेच, आमदार बच्चु कडू यांची व पक्षाचे ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकरी, कामगार, गोर-गरीब, शोषित, अपंग, पीडित यांना न्याय मिळवून देण्यासाठी रमेश शितोळे प्रयत्न करणार आहे व कटिबद्ध राहणार .

Previous articleवारूळवाडी व पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथे घरोघरी जाऊन सर्वेक्षण
Next articleदौंड मध्ये भाजपा’चे सरकार विरोधात आंदोलन