वारूळवाडी व पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथे घरोघरी जाऊन सर्वेक्षण

नारायणगाव (किरण वाजगे)

कोरणा विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव व वारूळवाडी येथे आज प्रशासनाच्या वतीने घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ऑक्सिजन लेवल, पल्स रेट, व तापमान याबाबतची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अशी माहिती पिंपळगाव चे तंटामुक्ती अध्यक्ष रंगनाथ गुळवे व वारूळवाडीचे उपसरपंच सचिन वारुळे यांनी दिली.


यावेळी जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, तसेच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, डॉ. वर्षा गुंजाळ, डॉ चैताली कांगुणे, वारूळवाडी चे उपसरपंच सचिन वारुळे, सदस्य राजेंद्र मेहेर, पिंपळगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष रंगनाथ गुळवे, मुख्याध्यापिका श्रीमती गडगे, स्वयंसेवक प्रज्योत येलमर, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर वाणी, रवींद्र खांडगे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप वाणी, संभाजी गुळवे, अंकुश गुळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

वारूळवाडी येथे आज एकूण १४ हजार २५३ एवढ्या लोकसंख्ये पैकी १३८४३ ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २४० सस्पेक्टेड रुग्ण आढळले.यापैकी २१ रुग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. या सर्वेक्षण कामामध्ये एकूण ७७ टीमने सहभाग घेतला. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड व वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.

Previous articleभोसे येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विविध उपक्रमांनी ऑनलाईन शिक्षक दिन सप्ताह उत्साहात
Next articleप्रहार जनशक्ती पक्षाच्या दौंड तालुकाध्यक्षपदी रमेश शितोळे यांची निवड