भोसे येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विविध उपक्रमांनी ऑनलाईन शिक्षक दिन सप्ताह उत्साहात

चाकण– भोसे (ता.खेड) येथे शिक्षक म्हणजे संस्काराची शिदोरी.आई वडिलांनंतर प्रत्येकासाठी महत्त्वाचे स्थान म्हणजे शिक्षक. आजही त्यांच्याकडे पाहिले जाते ते श्रद्धास्थान व आधारस्थान म्हणूनच.आपल्या कर्तृत्वाने विद्यार्थ्यांशी व समाजाशी नात्याची विणा गुंफणारे शिक्षक आजही सर्वत्र कौतुकाचा विषय बनतात. अशाच शिक्षकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिक्षकदिनानिमित्त ‘थँक्स अ टीचर ‘ अभियानांतर्गत प्रशालेत शिक्षकदिन सप्ताहाचे ५ सप्टेंबर २०२० ते ११ सप्टेंबर २०२० या कालावधीत विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करून करण्यात आले असे प्रशालेचे प्राचार्य गोकुळ कांबळे यांनी सांगितले.

प्रशालेतील इयत्ता आठवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धा व उपक्रमात उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. या वर्षीचा शिक्षक दिन कोरोनाच्या रोगाच्या पार्श्वभुमीवर ऑनलाईन पद्धतीने साजरा केला गेला.

यंदा शिक्षक दिनाच्या अनुषंगाने “माझे प्रेरक शिक्षक” या विषयावर विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंधलेखन, पोस्टर, घोषवाक्य, कविता, प्रेरणा व प्रबोधनात्मक गीतवाचन, नाट्यवाचन, अभिवाचन स्पर्धा, मी कोविडयोद्धा-अनुभव कथन, शैक्षणिक रांगोळी, चित्रकला, सुशोभन स्पर्धा, शिक्षणातील प्रयोगशील उपक्रमांचे सादरीकरण करणे, पुर्वी शिक्षक असलेले पण आता उच्च पदावरील व्यक्तींच्या मुलाखती घेणे स्वत: व्हिडीओ तयार करून पाठविणे या स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे होते. तरी सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन या उपक्रमात सहभाग नोंदविला.

मी कोविडयोद्धा – अनुभव कथन या कार्यक्रमात सामाजिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्वे करणा-या शिक्षकांना मी कोविडयोध्दा योजना कुटे, संगिता हलगे, दिनेश गुंडगळ, रोहन सावंत व संतोष गांडेकर यांना बहाल करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विशेष सहभाग व मार्गदर्शक म्हणून भोसे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेवक संतोष बबन केदारी, गव्यसिद्ध आशिर्वाद हलगे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांचे उद्बोधन करण्यासाठी मान्यवरांचे मार्गदर्शन व चर्चा या कार्यक्रमात मार्गदर्शक मान्यवर सामाजिक प्रबोधनकार व प्रेरणादायी व्याख्याते राजेश टेकरीवाल तसेच अग्रवाल चँरिटेबल ट्रस्ट पुणे सामाजिक कार्यकर्त्या वंदना कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी व आव्हाने यांची माहिती करून दिली.


विविध स्पर्धांसाठी समन्वयक व परीक्षक म्हणून योजना कुटे,चतुर पाटील,एकनाथ थिटे,ऐश्वर्या वायभासे, नरसिंह पांचाळ,संगिता हलगे,मिनाक्षी पुंडेसुवर्णा गांडेकर यांनी स्पर्धांचे योग्य नियोजन करून पारदर्शपणे स्पर्धा पार पडल्या.वरील स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. तसेच प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिके जाहीर करण्यात आली.

या स्पर्धांसाठी शाळेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गोकुळ कांबळे,शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षक पालक संघ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच भोसे ग्रामस्थ यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Previous articleनारायणगांव कोविड सेंटर ला खुर्ची सम्राट व्हाँट्सएप ग्रूपच्या वतीने “हाय ऑक्सीजन” मशीन भेट
Next articleवारूळवाडी व पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथे घरोघरी जाऊन सर्वेक्षण