कोरोना सर्वे मोहिमेतील शिक्षकांना सुरक्षा किट द्या-गौतम कांबळे

Ad 1

गौतम कांबळे

दिनेश पवार, दौंड (प्रतिनिधी)

कोरोना सर्वेमध्ये सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांना आवश्यक ती सुरक्षा साधने ध्या अशी मागणी

राज्य कास्ट्राईब शिक्षक आघाडीचे महासचिव गौतम कांबळे यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

मा . डॉ .राजेश देशमुख जिल्हाधिकारी पुणे यांच्याशी संपर्क साधून कोरोणा रुग्ण शोध मोहिमेतील शिक्षकांना सुरक्षा साधने पुरवण्याची मागणी केली .covid-19 च्या कामकाजात सहभागी दोन प्राथमिक शिक्षकांचा मृत्यू झाल्याची माहिती मा . जिल्हाधिकारी पुणे यांना दिली .

गायकवाडसाहेब उपविभागीय अधिकारी दौंड यांच्याशी संपर्क साधून वरील मागणी केली आहे .

जिल्ह्यातील प्राथमिक / माध्यमिक शिक्षकांना कोरोना  सर्व्हेची ड्यूटी लावण्यात आली आहे .शिक्षकांना ही ड्युटी देण्याअगोदर फेसशिल्ड , शॅनीटायझर , हॅन्डग्लोज व मास्क देण्याची मागणी केली .तसेच 55 वर्षे पेक्षा अधिक व झालेल्या शिक्षकांना covid-19 चे कामकाज देण्यात येऊ नये अशीही मागणी मा .जिल्हाधिकारी पुणे व  उपविभागीय अधिकारी दौंड यांचेकडे केली असून साहित्य न मिळाल्यास कामावर बहिष्कार टाकणार असल्याचे  सांगितले आहे .मा.देशमुखसाहेब जिल्हाधिकारी पुणे यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी तातडीने संपर्क साधून सुरक्षा साधने पुरवण्याची सूचना करतो असे आश्वासन दिले असल्याचे श्री गौतम कांबळे राज्य महासचिव महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ प्रणित शिक्षक आघाडी यांनी दिली .