अडीवरे येथे पीठ गिरणी व्यावसायिकाला फायटरने मारहान

Ad 1

प्रमोद दांगट : प्रतिनिधी

अडीवरे ता.आंबेगाव येथील पीठ गिरणी चा व्यवसाय करणारे तानाजी धोंडु जढर यांनी आपल्या गिरणीतून हरवलेल्या मोबाईल बाबत गिरणीत दळण दळण्यासाठी आलेल्या दोघांना विचारले असता त्यांनी जढर यांना लोखंडी फायटरने मारहाण केली असल्याची घटना घडली आहे. याबाबत जढर यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

दिलेल्या फिर्यादिनुसार दि.08/09/2020 रोजी जढर हे आपल्या पिठ गिरणीत सकाळी लोकांची दळने दळत होते. त्यावेळी त्यांनी त्यांचा मोबाईल गिरणीतील देवा-याचे खिडकीत ठेवला. त्यावेळी त्यांचे शेजारील आमडे गावातील सुनिल उर्फ माया मारुती असवले व त्याचे बरोबर असलेला आसाणे कोंपेवाडी येथील एक इसम असे भात भरडण्यासाठी आले होते. त्यांचा भात भरडुन देऊन गिरणी बंद करून जढर हे घरी गेले असता त्यांचा मोबाईल गिरणीत राहिल्याने त्यांनी पत्नीला गिरणीत खिडकीत मोबाईल ठेवला आहे, तो घेवुन ये असे सांगितले मात्र गिरणीत मोबाईल सापडला नााहि जढर यांना भात भरडन्यासाठी आलेले सुनिल उर्फ माया मारुती असवले व त्याचे सोबत असलेल्या व्यक्तीने मोबाईल घेतला असल्याचा संशय आला म्हणुन जढर यांनी त्यांचा शोध घेत त्यांना मोबाईल बाबत विचारले व झडती घेतली असता मोबाईल मिळाला नाही. तेव्हा सुनिल असवले याने शिविगाळ दमदाटी करुन तुझ्याकडे पाहुन घेतो अशी धमकी दिली. त्यानंतर सायंकाळी 5:30 वा सुनील असवले हा जढर यांच्या घरी जाऊन माझेवर मोबाईल चोरीचा संशय का घेतला असे म्हणुन जढर यांना शिविगाळ दमदाटी करुन हाताने मारहाण केली तसेच खिशात असलेला लोखंडी फायटर काढुन नाकावर, तोंडावर मारुन जढर यांना जखमी केले याबाबत जढर यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास घोडेगाव पोलीस करत आहे.