चांडोली बुद्रुक येथे किरकोळ कारणावरून तिघांना मारहाण

Ad 1

प्रमोद दांगट : प्रतिनिधी

चांडोली बुद्रुक ता.आंबेगाव येथे न्हायरे मळा रोडवर गाडीने कट मारली या कारणावरून तिघांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत सुरेश ज्ञानेश्वर थोरात यांनी दोघांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवार दिनांक 8 रोजी फिर्यादीचा भाऊ आकाश ज्ञानेश्वर थोरात गावातुन घरी येत असताना न्हायरेमळा रोडवर त्याच्या बुलेट गाडीला स्विफ्ट या चारचाकी गाडीने कट मारली त्यावेळी आकाश खाली पडला असता गाडीतील मोहन दत्तात्रय वाघ व शुभम कचरू थोरात (दोघेही राहणार चांडोली बुद्रुक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे) यांनी खाली उतरून आकाश बरोबर बाचाबाची केली तसेच त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली याबाबत आकाश ने फोन करून आपला भाऊ सुरेश ज्ञानेश्वर थोरात याला कळविले असता तो घटनास्थळी गेला त्यावेळी त्या दोघांनी सुरेश थोरात यालाही मारहाण केली तसेच यावेळी सुरेश थोरात यांचा मावस भाऊ सिद्धेश गायकवाड हा त्या ठिकाणी आला असता त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली यासंदर्भात सुरेश ज्ञानेश्वर थोरात यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.