कृष्ण प्रकाश हे गरीबांना न्याय देण्यात नेहमीच अग्रेसर-नामदेव भोसले

Ad 1

अमोल भोसले, उरुळी कांचन

पिंपरी चिंचवडचे नविन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश हे गरीबांना न्याय देण्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत त्यांनी बुलडाना, अहमदनगर, सांगली, या ठिकाणी आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे, त्यांनी आत्तापर्यंत वेगवेगळे उपक्रम राभवले त्या मध्ये विशेष म्हणजे पारधी समाजातील मुलांनसाठी शिक्षणाचे दारे खुली करुन दिली. अनेक गरीब कुटुंबाला रोजंदारी निर्माण करुन दिली अनेक तरुणांना गुन्हेगारीच्या कलंकित जिवणातून बाहेर काडले व त्यांना स्वताचे छोटे मोठे व्यवसाय उभारण्यास मदत केली .

त्यांच्या अथांग प्रयत्नाने आत्ता पर्यंत पारधी समाजातील दहा मुले पोलिस भरती झाले असे वेगवेगळे कामं करत असताना कृष्ण प्रकाश यानी अनेक गरीब कुटुंबाच्या चुली पेटवल्या त्याच बरोबर आपल्या भारत देशाचे नाव सायकलिंग स्पर्धेत एक नंबर ला आणले तसे कृष्ण प्रकाश हे मुळचे झारखं येथील आहेत परंतू अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण केले व पुढे आय पी यस झाल्यानंतर आपल्या कांमाच्या रुपाने पोलिस खात्यात त्यांनी आपली नाविन्यपूर्ण ओळख निर्माण केली. नूकतीच पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त म्हणून जबाबदारी मिळाली कृष्णा प्रकाश हे गरीबावर अन्याय करणा-यावर कडक कारवाई करतील अशी चर्चा पिंपरी चिंचवड मधील गोर गरीब जनता करत आहे. कृष्ण प्रकाश यांना ” ये हाल, पुस्तक भेट देताना शेवराई सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले, लेखक भास्कर भोसले, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक तथा हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल जगताप, सुनिल भोसले आदी उपस्थित होते.