पोलिस पाटलांना पन्नास लाखांचा विमा संरक्षण कवच भेटावे- खेड तालुका पोलिस पाटील संघटनेचे तहशीलदारांना निवेदन

राजगुरूनगर-महाराष्ट्रात करोना महामारी चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ग्रामस्थरीय करोना दक्षता समिती स्थापना केली आहे.या समिती मध्ये पोलीस पाटील सदस्य/सचिव म्हणून काम करतात ,पोलीस पाटील आपला जीव धोक्यात घालून अहो रात्र काम करतात.पोलीस पाटील गावाची सुव्यवस्था, शांतता, राखण्याचे व त्याच बरोबर करोना बाबतची जनजागृती करतात, व गावाची सेवा करत असताना आतापर्यंत राज्यात 13 पोलीस पाटीलांनचा मृत्यू झाला आहे.पोलीस पाटीलनी वेळोवेळी शासनाकडे मागणी करून पण शासनाने दुर्लक्ष केलं आहे.

पोलीस पाटील हा गावाचा कणा आहे.पोलीस पाटीलना तर विमा कवच देण्याचा विचार करावा.म्हूणन महाराष्ट्रतील प्रत्येक तालुक्यातील तहसिल,प्रांत कार्यालय, तालुका प्रतिनिधी ,यांना निवेदन देण्यात आले आहे.जर शासनाने मृत्यूमुखी पडलेल्या पोलीस पाटीलन वच्या कुटुंब व त्यांच्या परिवाराच्या विचार केला नाही तर जिल्हाअधिकारी कार्यालाया समोर उपोषणला बसणार असा इशारा महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटननेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी दिला आहे.

खेड तालुक्यातील प्रांत कार्यालय,तहसील, तालुका प्रतिनिधी यांना खेड तालुका पोलीस पाटील संघटनने च्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी उपस्थित पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनचे कार्यकारी अध्यक्ष साहेबराव राळे,तालुका अध्यक्ष अशोक चौधरी, उपाध्यक्ष आत्माराम डुंबरे, कार्यकारी अध्यक्ष निलेश दौडकर,पप्पूकाका राक्षे, दादाभाऊ निकाळजे, संदीप भागडे,सुषमा आरुडे उपस्थित होते.

महाराष्ट्रतील पोलीस पाटीलना शासनाने पन्नास लाखाचे विमा कवच द्यावा. जर शासनानी या मागणीचा विचार केला नाही तर उपोषणाला बसणार-बाळासाहेब शिंदे पाटील,अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोलीस पाटिल संघटना.

खेड तालुक्यातील प्रत्येक पोलीस पाटलांना शासनाकडून मास्क, पी पी किट,मास्क उपलब्ध करून द्यावा-आत्माराम डुंबरे पाटिल
उपाध्यक्ष पोलीस पाटील संघटना खेड तालुका

Previous articleकुरवंडी येथे “विकेल ते पिकेल” कार्यक्रम संपन्न
Next articleकृष्ण प्रकाश हे गरीबांना न्याय देण्यात नेहमीच अग्रेसर-नामदेव भोसले