कुरवंडी येथे “विकेल ते पिकेल” कार्यक्रम संपन्न

Ad 1

प्रमोद दांगट, आंबेगाव

आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी येथे “विकेल ते पिकेल ” अंतर्गत बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिर्वतन अभियानाची (SMART) या प्रसंगी कृषी विभागाच्या यु-टयुब वाहीनीवर लाईव्ह माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामपातळीवरील कृषि विकास कार्यक्रमाची रुपरेषा मांडून “चिंतामुक्त” शेतकरी व “शेतकरी केंद्रित” कृषि विकास यावर आपले विचार मांडलेत व शेतकऱ्यांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विविध कृषि विषयक योजनांसंदर्भात गुरुवारी 10 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 1:30 या वेळेत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे, कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, कृषि सचिव एकनाथ डवले, पोकराचे प्रकल्प संचालक रस्तोगी, कृषि आयुक्त धीरज कुमार उपस्थित होते.

” विकेल ते पिकेल ” गाव कुरवंडी येथे ऑनलाईन पद्धतीने लॅपटॉप च्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, कृषि सहायक प्रमिला मडके, संरपंच व गावातील शेतकरी उपस्थित होते..