माजी आमदाराचा कारनामा; सुरेश गोरेंकडून राजमुद्रेचा गैरवापर

पुणे जिल्ह्यातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश गोरे भारताचे राष्ट्रचिन्ह (राजमुद्रा) असलेल्या लेटरपॅडचा गैरवापर करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

खेड आळंदी विधानसभेचे माजी आमदार सुरेश गोरे यांना निवडणुकीत मोठया मताधिक्याने पराभव स्वीकारावा लागला.पराभव झाल्यानंतर ते आजतागायत स्वतःला आजी आमदार असल्याचे प्रशासकीय कामात हस्तांतर करून भासवत आहे. शिवाय सरकारने दिलेल्या अधिकाराचा गैर फायदा घेऊन राजमुद्रेचा लेटरपॅडवर वापर करून संविधानाने दिलेल्या लोकप्रतिनिधींना अधिकाराचा दुरुपयोग करत लोकशाहीचा अवमान करत आहेत. मिळालेल्या पदाचा त्यावेळेस योग्य उपयोग केला असता व आपल्या सामाजिक कार्याची आवड त्यावेळेस दाखवली असती तर पराभवाला सामोरे जावे लागले नसते परंतु आज समाजकार्य करत असताना संविधान व लोकशाही याचाही विचार करणे महत्त्वाचे आहे याचा अर्थ सुरेश गोरे यांना लोकशाही मान्य नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सुरेश गोरे हे माजी आमदार असून ते आजही मीच तालुक्याचा आमदार आहे असे भासवून स्वतःच्या लेटरपॅडवर भारताचे  राष्ट्रचिन्ह (राजमुद्रा) वापरून पत्रव्यवहार करत आहेत. गोरे यांनी खेड पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाबाबत  “खेड आळंदी विधानसभा आमदार असा उल्लेख असलेल्या लेटरपॅडवर भारताचे राष्ट्रचिन्ह ” (राजमुद्रा)चा वापर करून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना पत्र लिहले. या पत्रात त्यांनी त्यांचा आमदार म्हणून उल्लेख केला आहे .या पत्राबाबत सुरेश गोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो मात्र झाला नाही.

“पदावरून पायउतार झाल्यानंतर अधिकार नसताना लेटरपॅडवर राजमुद्रेचा वापर करून आमदार म्हणून मंत्र्यांशी पत्रव्यवहार करणे चुकीचे आहे” असे खेड तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले तसेच याबाबत तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous articleपत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशी करावी, एस.एम.देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Next articleअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या आमदार राहुल कुल यांच्या कडुन प्रशासनास सुचना