मराठी पत्रकार परिषदेचा ‘रायगडाचा शिलेदार’ निखळला. पत्रकार संतोष पवार यांचे कोरोनामुळे आकस्मित निधन

Ad 1

मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस,माथेरान,जि-रायगड येथील पत्रकार संतोष पवार यांचे आज कोरोनानं निधन झालं.करोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते.श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना आज कर्जत येथील रूग्णालयात नेण्यात आले होते.परंतु, व्हेंटिलेटरची गरज असल्याने पुढे मुंबईला हलविण्यात येत असतानाच रस्त्यातचं त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या आकस्मित जाण्यानं मराठी पत्रकार परिषदेचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे.

मराठी पत्रकार परिषद व महाराष्ट्रातील तमाम पत्रकार बांधवांच्यावतीने परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.