कंगणा राणावत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची भारतीय राष्ट्रवादी पार्टीची मागणी

Ad 1

पिंपरी चिंचवड : मुंबईला पाकव्याप्त काश्मीर आणि मुंबई पोलिसांबद्दल चुकीचे विधान करणारी कंगणा राणावत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी अजित संचेती,भारतीय राष्ट्रवादी पार्टी महाराष्ट्र राज्य जनसंपर्क प्रमुख अजित संचेती यांनी केली असून या बाबतचे निवेदन पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त यांना दिले आहे.

मुंबईला पाकव्याप्त काश्मीर आणि मुंबई पोलिसांबद्दल चुकीचे विधान करणारी कंगणा राणावत विरोधात भारतीय राष्ट्रवादी पार्टी आक्रमक झाली आहे .पिंपरी चिंचवड शहर तर्फे भारतीय राष्ट्रवादी पार्टी कंगणाचा धिक्कर करत पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.निवेदन मध्ये मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी,देश व महाराष्ट्राची शान संपूर्ण जगात मुंबईचे एक वेगळे महत्त्व आहे.चित्रपट सृष्टीचा गड असलेल्या मुंबई व महाराष्ट्रला अनेक कलावंत दिले,अनेक अभिनेते जिरो चे हिरो झाले,परंतु आज ज्या पद्धतीने कंगणा राणावत नावाच्या एका अभिनेत्रीने मुंबई व महराष्ट्राला उद्देशुन वादग्रस्त टीकेचे राजकारण सुरू केले आहे तसे कधीच घडले नाही,लाखो कोट्यधीशांचे पोट भरणाऱ्या मुंबई व महाराष्ट्र वर कोणी टीका केली नसेल अशी टीका या कंगणा राणावत नावाच्या बाईने केली आहे.

मुंबई ही पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या काश्मीर सारखी वाटू लागली आहे.असे वक्तव्य करून मुंबई ला पाकिस्तानचा दर्जा देऊन देशद्रोहाचे कार्य केले आहे.ज्या मुंबई आणि महाराष्ट्र नि कंगणाला मोठे केलं त्या मुंबईत राहिली मोठी झाली आणि तिला आता मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटू लागले,हेच निदनिय आहे,तिच्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तिला मुंबई आणि महाराष्ट्र वर येण्यास बंदी घालावी असे निवेदन पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त कडे देण्यात आले निवेदन देताना भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे जनसंपर्क प्रमुख महा,राज्य अजित संचेती, महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष संदीप गायकवाड,चित्रपट सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल पाटील,पिंपरी चिंचवड युवा शहराध्यक्ष अक्षय घोडके,युवा उपाध्यक्ष गिरीश पाटील,व राहुल उन्माळे हे उपस्थित होते.