पोलीस मित्र संघातील महिलांच्या वतीने कोविड सुरक्षा किटचे वाटप

Ad 1

दिनेश पवार-दौंड

कोरोना प्रादुर्भाव कमी करण्याच्या हेतूने पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य महिला विभागाच्या वतीने विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले या अभियानात रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या विना मास्क वाल्याना मास्क,सॅनिटायजर व रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे वाटप केले व कोरोना विषयी काळजी घ्या,मास्क वापरा, सोशल डिस्टन्स पाळा, विनाकारण बाहेर पडू नका अशा गोष्टी च्या बाबतीत जनजागृती केली.

यावेळीपोलीस मित्र संघ महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुरेश वाळेकर,महिला पोलीस मित्र संघ शाखा ड्रिम्स निवारा च्या उपाध्यक्ष-आरती मुन,प्रशांती साळवे,प्रियांका जाधव,मनीषा कुंभार, अर्चना वनपुरे,मोना ननवरे,कविता टोळे, सारिका जगताप,श्री.गुरुदत्त सेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुनील तुपे,योगेश जाधव,इत्यादी नी या कार्यक्रमाचे नियोजन केले, पोलीस मित्र संघ कोरोना प्रादुर्भावात जनजागृती अभियान राबविणे,पोलिसांना मदत करणे,कोविड सुरक्षा किट वापरणे, कौशल्य आधारित उपक्रम राबविणे असे विविध उपक्रम हाती घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करत आहे.