तिर्थक्षेत्र विकास समितीच्या अध्यक्षपदी ह.भ.प.सुरेश कांचन महाराज यांची निवड

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

अखिल भारतीय वारकरी संप्रदाय हवेली तालुका तिर्थक्षेत्र विकास समितीच्या अध्यक्षपदी ह.भ.प.सुरेश कांचन महाराज यांची निवड करण्यात आली.

अखिल भारतीय वारकरी मंडळ पुणे विभागीय अध्यक्ष आनंद महाराज तांबे यांनी केलेल्या शिफारसनुसार हवेली तालुका अध्यक्ष ह.भ.प. संतोष महाराज काळोखे यांनी कांचन यांची निवड केली. वारकरी संप्रदायाचे विचार, आचार, प्रसार, प्रचार करण्याचे काम अविरतपणे करणार असे मत निवडीनंतर सुरेश कांचन यांनी सांगितले.

यानिमित्ताने शिक्षक दिनाचे औचित्य साधून हवेली तालुका पत्रकार संघाच्या वतीने नवनियुक्त कांचन यांना सन्मानित करण्यात आले.