लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक ; मंचर येथील प्रकार

Ad 1

प्रमोद दांगट : प्रतिनिधी

मंचर येथील गायमुख फाटा येथील एका युवकाने अल्पवयीन युवतीच्या ओळखीचा गैरफायदा घेत तिला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणात सदर मुलगी तीन महिन्याची गरोदर राहिल्याने आरोपीने व त्याच्या वडिलांनी मुलीला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या देऊन पीडितेच्या पोटातील अर्भकाच्या जीवास धोका निर्माण करून पीडितेस ओपरेशन करण्याची वेळ आनली असल्याने पिढीत मुलीने सागर रशिद पठाण व रशिद गुफुर पठाण यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार ,पिडीत मुलगी तिच्या कुटुंबासोबत गायमुखाफाटा ( मंचर ) परिसरात भाडेतत्वावर राहत असून मुलीच्या घराच्या वरच्या मजल्यावर आरोपी घरमालक रषिद गफुर पठाण व मुलगा सागर रशीद पठाण हे राहत आहेत. यातील सागर पठाण हा मुलीच्या घरी येत जात असल्याने दोघांची ओळख निर्माण होऊन दोघांमध्ये प्रेमसंबध निर्माण झाले. सप्टेंबर 2019 या महिन्यांतील एका रविवारी पीडितेच्या घरी कुणी नसताना सागर पठाण याने पीडित युवतीच्या घरी जाऊन मी तुझे बरोबर लग्न करणार आहे असे अमिश दाखवून जबरदस्तीने तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले त्यावेळी पीडित मुलगी अल्पवयीन होती. त्यानंतर वेळोवेळी आरोपी सागर पठाण याने पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले . त्यानंतर तीन महिन्यांनी पीडितेला ती गरोदर राहील्याचे समजले असता सागर याने तिला गर्भ खाली करण्याचे गोळया आणुन दिल्या.त्या गोळया खाल्लेनंतर पीडतेला जास्त त्रास होवु लागल्याने तिला उपचारासाठी अवसरी खुर्द येथे खाजगी हॅास्पिटलमध्ये नेले असता डाॅक्टरांनी पिढीत युवती तीन महिन्यांची गरोदर असल्याचे समजले व तिचा अर्धवट गर्भपात केला असल्याचे सांगितले.त्यानंतर पीडितेच्या आईने आरोपी व आरोपीच्या वडिलांना सागर व पीडितेच्या लग्नाबाबत विचारले असता त्यांनी पिडीतेसोबत लग्न करणेसाठी नकार देऊन सदरचा प्रकार कोणालाही सांगितलेस पीडितेस व कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत पीडितेने सागर रषिद पठाण आणि त्याचे वडील रषिद गफुर पठाण यांचे विरूध्द कायदेषीर तक्रार दिली असून आरोपींवर भा. द. वि.कलम 376 (2) (N),313 , 506 बाल लैगिंक अत्याचार अधिनियम 2012 चे कलम 2, 4, 8, 12 प्रमाणे गुंज दाखल केला आहे .या घटनेचा तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अर्जुन शिंदे करत आहेत .