ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेच्या कायदेशीर सल्लागार पदी किरण लोंढे

Ad 1

दिनेश पवार-दौंड

ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र राज्य कायदेशीर सल्लागार पदी प्रसिद्ध वकील किरण लोंढे यांची निवड करण्यात आली, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-सदाशिव रणदिवे, मानवाधिकार सुरक्षा संघाचे-पुणे जिल्हा कार्याध्यक्ष-सुभाष कदम यांच्या हस्ते लोंढे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी समृद्धी प्रज्ञा शोध परीक्षेचे प्रमुख हरून पठाण उपस्थित होते,किरण लोंढे यांचे सामाजिक कार्य,व कायदेशीर असणारे योग्य ज्ञान या गोष्टी पाहून त्यांची संस्थेच्या महाराष्ट्र राज्य कायदेशीर सल्लागार पदी निवड करण्यात आली आहे,ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था ही शिक्षण,सामाजिक, औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असणारी संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून गुणगौरव पुरस्कार समारंभ,स्टुडन्ट टॅलेंट एक्साम,विविध कौशल्य आधारित प्रशिक्षण, संगणक साक्षरता अभियान यासारखे उपक्रम राबविले जातात.

Attachments area