अखेर झारगडवाडी ते दरेकर पांद रस्त्याचा प्रश्न अजितदादा पवार यांनी लावला मार्गी

Ad 1

दिनेश पवार, पुणे

बारामती तालुक्यातील झारगडवाडी ते दरेकर पांद या रस्त्याचा प्रश्न अखेर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामुळे मार्गी लागला आहे.मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत या रस्त्याचे काम करण्यात आले आहे.

यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचा रखडलेला प्रश्न सुटला आहे.यासाठी ग्रामविकास मंत्रालय महाराष्ट्र शासन अंतर्गत अर्थसहाय्य मिळाले आहे,या रस्त्याची बरीच वर्षे दुरवस्था झाली होती, रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. वाहनचालकाना या रस्त्यावर येताना जाताना मोठी कसरत करावी लागत होती,कित्येक वेळा छोटे-मोठे अपघात ही घडले होते,रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी ग्रामस्थांनी व सचिन दादासाहेब थोरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. ती मान्य करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

याकामी शेडगे साहेब, सरपंच अनिता प्रकाश लांडगेयशवंत थोरात, अजित थोरात, संभाजी नाना होळकर, बाळा बीचकुले,दत्तात्रय बीचकुले,अर्जुन झगडे,भाऊसो कोळेकर,अजित बुरुंगले,अनिल माने,पोपट निकम,पोपट कुळाल,नारायण कोळेकर,निलेश दयाराम महाडिक, पत्रकार- नवनाथ बोरकर यांची यासाठी मोलाची साथ मिळाली