विशेष मुलांच्या शाळेत शिक्षक दिन साजरा

Ad 1

दिनेश पवार,दौंड

स्व.सुभाष आण्णा कुल विशेष मुलांची शाळा दौन्ड पुणे येथील प्रांगणामध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला,डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पूजन विशेष शिक्षक    श्री.दिगंबर पवार यांच्या हस्ते करण्यात आले ,यावेळी शिक्षण क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी, शिक्षकांचे महत्व,शिक्षणाचे महत्व या विषयी मान्यवरांनी विचार व्यक्त केले

तसेच विशेष मुलांच्या शाळेतील उपक्रम व त्यांच्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत समाजाने पुढे येणे गरजेचे आहे, समाजातील थोरामोठयांनी सामाजिक जबाबदारी ची धुरा जर हाती घेतली तर कोणीही शिक्षणापासून वंचीत राहणार नाही हे मात्र नक्की या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रशांत भंडारी उपस्थिथ होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष शिक्षक श्री.निलेश गोराडे,श्री.गिरिष हिप्परगि अधिक्षक श्री.वैभव शेलार, काळजीवाहक श्री.विनोद मराठे,सफाईगार श्री.संजय बनसोडे,शिपाई विक्रम शेलार यांचे सहकार्य लाभले तसेच आभार कला शिक्षक श्री.दिनेश पाटील यांनी मानले.

Attachments area

जाहिरात