कृषिदूत तुषार पोखरकर करतोय शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Ad 1

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

पिंपळगाव ( ता .आंबेगाव ) येथे शेतक-यांना सेफ्टी किट घालून शेतातील विविध पिकांना तणनाशक कसे मारावे व कोणती काळजी घ्यावी या बाबत कृषीदूत तुषार पोखरकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविदयालय राजमाची कराड येथील चतुर्थ वर्षातील विदयार्थी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतक – यांना शेतीत असलेल्या पिकांना सेल्फी किट वापरून तणनाशक फवारणी कशी करावी तसेच काय काळजी घ्यावी या बाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करत आहेत . सध्या कोरोना विषाणूच्या काळामध्ये हा कृषी कार्यक्रम घरीच राबवण्यात येत आहे. प्राचार्य शिंदे सर यांच्या मार्गदशनखाली हा कार्यक्रम पार पाडला जात आहे . कार्यक्रम समन्वयक प्रा. माने सर,प्रा.काटे सर काम पाहात आहेत .