भाजपतर्फे आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेत प्रिया कुर्‍हाडे प्रथम

दिनेश कुर्‍हाडे,आळंदी– शहरातील गणेशोत्सवावर जरी कोरोणाचे संकट असले तरीही महीलांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी आळंदी शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या या स्पर्धेचा निकाल आज जाहीर करुन विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

सदर घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक – प्रिया कुर्‍हाडे, द्वितीय क्रमांक – मोक्षदा पोफळे,तृतीय क्रमांक – मनिषा सुडे यांनी मिळवला आहे तर उतेजनार्थ खुशी बोरुंदिया यांना गौरविण्यात आले तर स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी भाजप महीला मोर्चा तालुकाध्यक्ष अॅड.मालिनी शिंदे,शहराध्यक्ष किरण येळवंडे,अॅड.प्रितम शिंदे, संदेश जाधव,सचिन काळे,युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश जोशी,ओबीसी आघाडीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे,सदाशिव साखरे,संतोष हजारे,गणेश उंबरे, सचिन सोळंकर पत्रकार अर्जुन मेदनकर आणि दिनेश कुऱ्हाडे उपस्थित होते.

पाहता-पाहता गणेशोत्सवाला सुरुवात होऊन सार्वजनिक मंडळांबरोबरच घरोघरी घरगुती गौरी-गणेशाचीही सुंदर आरास केली जाते.घरोघरी छोटेखानी देखावे साकारले जातात.अशा देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देखील दिला जातो. या घरगुती देखाव्यांना प्रसिध्दी मिळावी, त्याचे कौतुक व्हावे तसेच घरगुती गौरी-गणेश सजावटीसाठीच्या कौशल्य, कला, गुणांना अधिकाधिक वाव मिळावा यासाठी भाजपच्या वतीने घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती असे शहराध्यक्ष किरण येळवंडे यांनी सांगितले.

Previous articleसक्षम पिढी घडविणाऱ्या सर्व शिक्षकांचा महाराष्ट्राला अभिमान – उपमुख्यमंत्री अजित पवार
Next articleविशेष मुलांच्या शाळेत शिक्षक दिन साजरा