माहेर संस्थेच्या ‘वात्सल्यधाम’ प्रकल्पात गणेशोत्सव उत्साहात साजरा

गणेश सातव, वाघोली पुणे

वाघोली परिसरातील आव्हाळवाडी-मांजरी खुर्द हद्दीतील माहेर संस्थेच्या ‘वात्सल्यधाम’ प्रकल्पात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रकल्पातील बच्चे कंपनीबरोबरचं अबालवृध्दांनीही रोज सांयकाळी पार पाडणाऱ्या विविध कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला.

प्रकल्पातचं माती व इतर घटकांपासून तयार केलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती मुलांनी साकारल्या.त्याचबरोबर तयार केलेल्या मूर्तीला रंग हि मुलांनीचं दिला.

विसर्जन दिवशी आरती करुन शेवटी संस्थेतील मुलांनी नृत्य सादर केले व वाजतगाजत संस्थेच्या आवारातचं तयार केलेल्या कृत्रिम हौदात भावपूर्ण वातावरणात गणेशाचे विसर्जन करण्यात आले.

दहा दिवस पार पडलेल्या विविध गुणप्रदर्शनात सहभाग नोंदवलेल्या मुलांना विसर्जनाच्या दिवशी बक्षिसे देण्यात आली.
यासाठी प्रकल्प व्यवस्थापिका सुप्रभा आल्हाट व माहेरच्या कार्यकर्त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

Previous articleहडपसरचा पाणी पुरवठा लवकरच सुरळीत करण्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांंचे खा.डॉ. अमोल कोल्हे यांना आश्वासन
Next articleजुन्या भांडणाच्या रागातून लोखंडी गजाने तरूणाला बेदम मारहाण