साठवण बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी

Ad 1

दौंड,दिनेश पवार

दौंड तालुक्यातील काळेवाडी आणि भोसले वस्ती येथील सिमेंट बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी ग्रामपंचायत हिंगणीबेर्डी च्या वतीने कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभागा यांच्याकडे करण्यात आली आहे.

हिंगणीबेर्डी आणि काळेवाडी या गावांना पाणी पुरवठा विहीर सिंचनाच्या माध्यमातून केला जातो.साठवण बंधाऱ्यातील पाणी पातळी कमी झाल्याने पाणी पुरवठा अनियमित झालेला आहे.तो सुरळीत करण्यासाठी खडकवासला कालव्यातून बी.बी.सी.फाटा पाणी काळेवाडी व भोसले वस्ती येथील सिमेंट बंधाऱ्यात पाणी सोडल्यास पाणी पुरवठा सुरळीत होईल असे मत युवा नेते गणेश कैलास गायकवाड यांनी व्यक्त केले आहे