आनंद खामकर यांची शिवाजी विद्यापीठाच्या जाती आधारित भेदभाव प्रतिबंध समितीवर निवड

दौंड, दिनेश पवार-आनंदराव खामकर हे शिवाजी विद्यापीठात इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागात कार्यरत आहेत .महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अतिरिक्त महासचिव असून त्यांची विद्यापीठ अनुदान आयोग ,नवी दिल्ली च्या निर्देशानुसार शिवाजी विद्यापीठामधे जतिआधारीत भेदभाव प्रतिबंध समितीमध्ये मागासवर्गीय संघटना प्रतिनिधी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे . शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे प्रभारी कुलगुरू व पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ .नितीन करमळकर यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे .

त्यांच्या निवडीबद्दल मा. अरुण गाडे केंद्रीय अध्यक्ष , गौतम कांबळे राज्य महासचिव शिक्षक आघाडी , कृष्णा काळेल ,आनंद बनसोडे, शंकर लोणकर, विठोबा गाडेकर ‘काळे सर केंद्रप्रमुख करकम , मारुती वाघमारे, शंकर घोडे, दादा डाळिंबे चंद्रकांत सलवदे ,जयवंत पवार ,सुनील रुपनवर ,विजय जाधव , विनोदकुमार भिसे ,आप्पा जगताप, हौशीराम गायकवाड , राजेंद्र गायकवाड , दत्तात्रय सुर्वे, सतीश शिंदे ,चंद्रकांत गायकवाड, मिलिंद थोरात, कन्हैया गौड , सोपान कांबळे, बालाजी मादळे,शिवाजी गरड, रवींद्र अहिवळे, दुर्योधन चव्हाण, रत्नाकर चोरमले,सुजाता गायकवाड ,सीमा थोरात , संजया गिरडकर ,वर्षा महाजन , पल्लवी गोसावी , सुषमा भालेराव, रुपाली जगताप ,अपर्णा पोळ,सुरेखा बनसोडे, रोहिणी अहिवळे, प्रज्ञा वाघमारे ,वैशाली आठवले, जया सलवदे यांनी कास्ट्राईब शिक्षक आघाडीच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या .आनंदराव खामकर हे 2016 पासुन सातत्याने पाठपुरावा करत होते .समिती कामकाजाचे कार्यक्षेत्र शिवाजी विद्यापीठ व सलग्न महाविद्यालये आहेत .

विश्वविद्यालय अनुदान आयोग,नवी दिल्ली (UGC )आयोगाने उच्च शैक्षणिक संस्थामधे मागासवर्गीय विद्यार्थी,शिक्षक,अधिकरी व कर्मचारी यांच्यावर सतत होणाऱ्या अन्यायाची दखल घेऊन जाती आधारित भेदभाव प्रतिबंध समिती स्थापन करण्यासंदर्भात 2011पासुन 2019पर्यंत सर्व विदद्यापीठ/महाविद्यालय यांना आदेश दिले होते..परंतु मागील काही वर्षामधे विद्यापीठामधे समिती स्थापन करण्यासंदर्भात जाणिवपूर्वक टाळाटाळ करुन ugc च्या आदेशाचे उल्लघंन केले जात होते.

परंतु मा.प्रभारी कुलगुरुसो प्रा.डॉ.नितीन करमळकर सर यांचे अध्यक्षतेखालील कास्ट्राईबच्या (दि.18)रोजी प्रशासनासोबतच्या बैठकीमधे मा.कुलसचिव डॉ.विलास नांदीवडेकर व इतर अधिकरी यांच्या .उपस्थितीत अनेक गोष्टी निदर्शनांस आणल्यामुळे ugc च्या आदेशानुसार जतिआधारीत भेदभाव प्रतिबंधक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला .

विश्वविद्यालय अनुदान आयोग (UGC) नवी दिल्ली च्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे चे कुलगुरू व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर चे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे /नागपूर चे अतिरिक्त महासचिव श्री. आनंदराव खामकर यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये “जाती आधारित भेदभावास प्रतिबंध” समितीच्या सदस्य पदी नियुक्ती केली .

सदरची समिती शिवाजी विद्यापीठ व सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयमध्ये कार्यरत राहणार असून या कार्यक्षेत्रामध्ये शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यावर होणाऱ्या जातीआधारीत भेदभावास प्रतिबंध व अन्यायाचे परिमार्जन करेल.

Previous articleचीफ प्रमोटर विवेक ओबेरॉय यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व सुरक्षा किट चे वाटप
Next articleसाठवण बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी