चीफ प्रमोटर विवेक ओबेरॉय यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व सुरक्षा किट चे वाटप

दौंड (दिनेश पवार)-मानवाधिकार सुरक्षा संघ पुणे जिल्हा व दौंड तालुक्याच्या वतीने संघाचे विशेष चीफ प्रमोटर विवेक ओबेरॉय सर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम तर दौंड तालुक्याच्या वतीने सुरक्षा किट चे वाटप करण्यात आले.

मानवाधिकारसुरक्षा संघाचे प्रदेश अध्यक्ष अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश उपाध्यक्ष दिपक जाधव,प्रदेश कार्याध्यक्ष-बापुसाहेब कुलकर्णी, प्रदेश महासचिव-सुभाष भोसले, यांच्या सहमतीने कार्यक्रम घेण्यात आला.

सदर कार्यक्रमातील वृक्षारोपण चे आयोजन पुणे जिल्हा अध्यक्ष-नितीन मोरे,पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष उमेश जालिंदर शिंदे यांनी केले यावेळी 101 वृक्ष लावण्यात आले तर झाडे लावा,झाडे जगवा,पर्यावरण समतोल राखा हा संदेश देण्यात आला.

यावेळी मित्रमंडळी मोतीराम कदम,गणेश पवार, अजित गडदे, यांनी सहकार्य केले तर दौंड तालुक्यातील मास्क व रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या किटचे वाटप पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग चे निरीक्षक सदाशिव रणदिवे व पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष कदम यांच्या उपस्थित करण्यात आला सदर कार्यक्रमाचे नियोजन दौंड तालुकाध्यक्ष दिनेश भारत पवार,प्रा.अविनाश गायकवाड,संदीप बारटक्के, महेश साळवे,राहुल धावडे यांनी केले होते

Previous articleखेड तालुक्यातील वीज बिलांच्या तक्रारींची दखल घ्या अन्यथा तीव्र आंदोलन- खेड तालुका मनसेचा इशारा
Next articleआनंद खामकर यांची शिवाजी विद्यापीठाच्या जाती आधारित भेदभाव प्रतिबंध समितीवर निवड