खेड तालुक्यातील वीज बिलांच्या तक्रारींची दखल घ्या अन्यथा तीव्र आंदोलन- खेड तालुका मनसेचा इशारा

Ad 1

राजगुरूनगर-कोरोना मूळे गेली 5 महिने लॉकडाऊन असल्याने अनेक सर्वसामान्य लोकांचे प्रचंड हाल झाले आहेत गेली 5 महिन्याच्या काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत तसेच अनेक छोटे मोठे व्यवसायिक रस्त्यावर आले आहेत तसेच शेतकऱ्यांची अवस्था तर मेल्याहुनही मेल्यासारखी झाली आहे .आणि त्यातच लॉकडाऊनच्या काळात वाढीव विजबिले देऊन सरकार सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दिवसा ढवळ्या दरोडा टाकत आहे .

खेड तालुक्यातील असंख्य ग्राहकांच्या अनेक तक्रारी मनसेकडे आल्या असल्याने लॉकडाऊनच्या काळातील विजबिले त्वरित कमी करावीत,विजबिले दुरुस्ती करून मिळावीत,रीडिंग प्रमाणे महिन्यानुसार बिले मिळावीत अशी मनसेची मागणी आहे.

मनसेने केलेल्या मागणीची दखल 4 दिवसात घेतली न गेल्यास तीव्र आंदोलन करण्याचा असा इशारा मनसेचे पुणे जिल्हा अध्यक्ष समीर थिगळे यांनी दिला .

यावेळी मनवीसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत, खेड तालुका सचिव नितीन ताठे, खेड तालुका उपाध्यक्ष सोपान डुंबरे, राजगुरूनगर शहर अध्यक्ष सुनील साळवी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.