मुसळधार पाऊसाने झोडपले

Ad 1

आंबेगाव- तालुक्याच्या पूर्व भागाला काल (दि.३) रोजी ढगांच्या कडकडाटासह मुसळधार झालेल्या पावसाने चांगलेच झोडपले आहे‌.मात्र अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांसह वाहनचालकांची मोठ्याप्रमाणावर त्रेधातिरपीट केली आहे.

काल संध्याकाळी पाचच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह व मेघगर्जनेसह झालेल्या मुसळधार पावसाने सर्वांची त्रेधातिरपीट केली असून या मोसम मधला सगळ्यात मोठा पाऊस आज पुर्वभागात पडला आहे.अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, निरगुडसर,पारगाव, पोंदेवाडी,लोणी,धामणी भागात जोरदार पाऊस झाल्याने बळीराजा मात्र सुखावला आहे.

काही ठिकाणी शेतीची काम चालू असल्यामुळे त्यात व्यक्ती आला आहे तर या मुसळधार झालेल्या पावसाने अवसरी बुद्रुक येथील विजय धाबा शर्वरी ॲटो गॅरेज च्या समोर पावसाच्या व्हात आलेल्या पाण्याने उथळ भाग असल्याने तीन ते साडेतीन फूट पाणी साचले होते, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, या पाण्यात मार्ग काढताना एका वाहनचालकाला अंदाज न आल्याने त्याचे वाहन रस्त्याच्या शेजारी असलेल्या खड्ड्यात जाऊन अडकल्याने ट्रॅफिक जाम होऊन रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या सुरज हिंगे, राहुल हिंगे, शशी हिंगे यांच्या मदतीने वाहनांना रस्ता मोकळा करून देण्यात आला.