साने गुरूजी विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी रवींद्र चौधरी पाटील यांची नियुक्ती

Ad 1

राजगुरूनगर-विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.शामराव चौधरी हे दिनांक ३१/८/२०२० रोजी नियत वयोमानानुसार निवृत्त झालेले आहेत .श्री रवींद्र चौधरी सर हे उपशिक्षक पदी विद्यालयामध्ये सक्रिय काम करत होते.त्यांच्या सेवा काळामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच प्रगती साधण्याच्या उद्देशातून विद्यालयांमध्ये अनेक उपक्रम राबवले. शाळेच्या जडणघडणीसाठी व विकासासाठी त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे .यावर्षी विद्यालयाचा एसएससी परीक्षा मार्च 2020 मध्ये शंभर टक्के निकाल लागलेला आहे .

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बापूसाहेब चौधरी पाटील व उपाध्यक्ष श्री .शिवाजीराव गायकवाड, सचिव श्री .विनायकराव चौधरी पाटील व सर्वच पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित मुख्याध्यापक रवींद्र चौधरी सर यांचे अभिनंदन केले आहे. संपूर्ण तालुक्यातील सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक व सर्व स्नेही यांच्याकडून अभिनंदन होत आहे .

शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या क्रांतिकारकांनी भारतभूमीसाठी प्राणाची आहुती दिली. त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन ज्या भूमीमध्ये आपण राहतो त्या क्रांतिकारकांचे स्मरण व्हावे म्हणून हुतात्मा राजगुरूंचे जन्मस्थान असलेले राजगुरुनगर येथील यांच्या कार्याचा आढावा घेऊन “मी राजगुरू बोलतोय “हा एकपात्री प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सादर करण्याचा अनेक वर्षे प्रयत्न करत आहेत . त्या माध्यमातून शहीद भगतसिंग यांचे भाचे जगमोहनजी, गांधीनेत्या शोभनाताई रानडे, दहशतवादविरोधी फोर्सेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनजीतसिंग बिट्टा, थोर समाजसेवक बाबा आढाव, श्री. विश्वनाथजी कराड, अशा अनेक मान्यवरांनी या एकपात्री प्रयोगाचे कौतुक केले आहे .भारत सरकारच्या संकल्प से सिद्धी या कार्यक्रमांतर्गत त्यांनी एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून देशभक्तांचे गुणगान गायले आहे. या कार्याबद्दल भारत सरकारच्या अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग डायरेक्ट रेट ऑफ फीड पब्लिसिटीचे प्रशस्तीपत्रक प्राप्त झालेले आहे.

राष्ट्रीय बहुजन विकास महासंघ प्रशस्तीपत्रक ,कला नाट्य अकादमी पुणे तर्फे एकपात्री प्रयोगांमध्ये प्रथम क्रमांक, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार, साम टीव्ही चॅनल वरती एकपात्री प्रयोगाबद्दल मुलाखत चित्रपट निर्मिती क्षेत्राचा अनुभव, लेखक, खरपुडी बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पद, खेड तालुका माध्यमिक पतसंस्थेचे सचिव ,गावचे पोलीस पाटील पद, सामाजिक कार्यांमध्ये गावांमधील मंदिर उभारण्यासाठी भरीव कामगिरी असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे श्री चौधरी सर यांची नुकतीच साने गुरुजी विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी नियुक्ती होऊन पदभार स्वीकारला. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

जाहिरात