कोचिंग क्लासेस ला मान्यता न दिल्यास बेमुदत आमरण उपोषण

दिनेश पवार,दौंड-संपूर्ण जगात व देशात कोरोना च्या प्रादुर्भावामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत, महाराष्ट्रात देखील अशीच परिस्थिती आहे परंतु काही व्यवसाय शासनाच्या नियम अटीनुसार सुरू करण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे कोचिंग क्लासेस ला ही नियमांच्या अधीन राहून परवानगी द्यावी अशी मागणी सरकार कडे कोचिंग क्लासेस असोसिएशन च्या वतीने करण्यात आली आहे,

मागणीमान्य न झाल्यास दिनांक 10 सप्टेंबर 2020 सकाळी 10 पासून असोसिएशनच्या वतीने राज्याध्यक्ष प्रा.पांडुरंग मांडकीकर, उपाध्यक्ष प्रा.पी.एम. वाघ,सरचिटणीस प्रा. ज्ञानेश्वर ढाकणे,कोषाध्यक्ष-प्रा.आप्पासाहेब मस्के,व राज्य संघटक प्रा.संदीप मस्के तसेच राज्यातील असंख्य क्लासेस संचालक व खाजगी शिक्षक आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे सांगण्यात आले.

सरकारने कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या खालील मागण्या मान्य कराव्या यामध्ये सोशल डिस्टन्स चे पालन करून,सरकारच्या नियमांचे पालन करून एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे मान्यता द्यावी,कोचिंग क्लासेस व्यावसायिकांना दिनांक 1 एप्रिल 2020 पासून क्लासेस पूर्ववत होईपर्यंत प्रतिमाह 40000 व खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांना प्रतिमाह 20000 रुपये मानधन देण्यात यावे,जागा मालकांनी भाडे माफ करावे असा आदेश शासनाने त्वरित काढावा,कोचिंग क्लासेस व्यावसायिकांना मुद्रा लोण ध्यावे,क्लासेस क्षेत्राचा सूक्ष्म व मध्यम उद्योग अंतर्गत नोंद करावी,कोविड प्रादुर्भावातील शासनाचे सर्व कर माफ करावेत,58 वर्ष पुढील व्यावसायिकांना दरमहा 20000 रुपये निवृत्तीवेतन जाहीर करावे, माध्यमिक व उच्च माध्यमिक व प्राध्यापक यासाठी बी.ई. व एम.ई. ही पदवी ग्राह्य धरावी,5 वर्षे अनुभव व 40 वर्षे कमी वय असणाऱ्यास शिक्षकांना सरकारी नोकरीत 25%आरक्षण ध्यावे,शाळा, महाविद्यालयातील व पेन्शन धारकांना शिकवणी घेण्यास परवानगी देऊ नये आशा विविध मागण्यासाठी कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना

निवेदन देण्यात आले आहे निवेदनाची दखल घेऊन क्लासेस साठी शासनाच्या नियमानुसार त्वरित परवानगी द्यावी अशी मागणी कोचिंग क्लासेस असोसिएशनचे प्रवक्ते प्रा.संतोष टेळे,अतुल टेळे,यशराज चव्हाण, प्रशांत ढाकणे,राज टेळे यांनी केली आहे.

Previous articleएमटीडीसी’ची रिसॉर्ट पर्यटकांना अतिउत्तम सेवा देण्यासाठी सज्ज – दिपक हरणे
Next articleशासकीय सेवेत संधी मिळालेल्या खेळाडूंचा उपयोग नवीन खेळाडू घडवण्यासाठी व क्रीडाविकासासाठी करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार