एमटीडीसी’ची रिसॉर्ट पर्यटकांना अतिउत्तम सेवा देण्यासाठी सज्ज – दिपक हरणे

पुणे– संपूर्ण जगाप्रमाणेच कोरोना व्हायरस या महामारी मुळे आपला भारत देश ही प्रभावित झालेला आहे. विश्व महायुद्धानंतर नजीकच्या काळात संपूर्ण जगावर आलेले हे फार मोठे संकट असून याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दुष्परिणाम हा पुढील अनेक वर्ष सोसावा लागणार आहे. आपल्या देशापेक्षा प्रगत असलेल्या अनेक प्रगतीशील देशात सुद्धा या व्हायरसमुळे हाहाकार माजवला आहे.

आपले देशात आपल्या सध्याच्या सरकारांनी घेतलेल्या ठोस उपाययोजनांमुळे आजच्या तारखेपर्यंत आपण म्हणावे तसे इतर युरोपियन राष्ट्रांतप्रमाणे बाधित झालेलो नाही. टाळेबंदीमुळे देशाची आर्थिक परिस्थिती खराब होणे, रोजगार -नोकरी काम धंदा यांचे प्रश्न तयार होणे, जीडीपी चा रेट कमी होणे, असे अंदाज काही तज्ञ वर्तवीत आहेत.

यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या महामारी नंतरच्या काळात तातडीच्या व दीर्घकालीन उपायोजना महामंडळाकडून हाती घेण्यात येत आहेत.

आपली पर्यटक निवासे ही महामंडळाचे कर्मचारी “स्वच्छता हीच सेवा” हे ब्रीद उराशी बाळगून टाळेबंदीच्या कठीण काळातही काम करुन परिसर आणि खोल्या सुसज्ज आणि स्वच्छ ठेवत आहेत. पर्यटक निवासे किरकोळ दुरुस्त्या आणि निर्जंतुकिरण करण्यात आल्या आहेत. उपहारगृह आणि अनुषंगिक बाबींची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकिकरण करण्यात आले आहे. आसपासचा परिसर स्वच्छ ठेवत आहोत. त्याचबरोबर पर्यटक निवासांसाठी विविध निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना साधारणतः पुढील वर्षासाठी करणे व पर्यटकांना आपली निवासे ही आरोग्यासाठी उत्तम असण्याची खात्री देण्यात येत आहे. तसेच शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे,ऑक्सीमिटर अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असुन सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकिय तपासणी आली आहे. शासनाच्या आदेशानुसार पुन्हा रिसॉर्ट खुली करण्यात येणार असून, अधिक काळजी घेण्यात येणार आहे.

या महामारी च्या दरम्यान सर्व लोक घरी बंदिस्त अवस्थेत असल्यामुळे शारीरिक व मानसिक दृष्ट्या प्रचंड त्रासलेले आहेत. अशा परिस्थितीत अशा पर्यटकांना लॉकडाऊन नंतर बाहेर पडण्याची इच्छा होणार आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला तर पर्यटक मोठया प्रमाणावर बाहेर पडतील व पर्यटनाला चालना मिळेल. पर्यटक देशाबाहेर जाण्यापेक्षा महाराष्ट्रातच प्राधान्य देतील. त्यासाठी ही मंडळी आपल्या पर्यटक निवासात येण्यासाठी आणि पयार्याने पर्यटन व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

सरकारने जिल्हयाअंतर्गत प्रवासाला मान्यता दिल्यामुळे पर्यटनास बहर येणार आहे.
दरम्यान, सध्याच्या वातावरणात पर्यटकांना आयुर्वेदीक आणि नैसर्गिक खाद्यपदार्थ आणि वातावरण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पर्यटकांना स्वच्छ आणि रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ले, प्राचीन मंदीरे आणि संस्कृती, हिरवागार निसर्ग, अप्रतिम खाद्यपदार्थ यांची मेजवानी देण्यासाठी महामंडळ आतुरतेने वाट पहात आहे.

या महामारीच्या काळामुळे महामंडळाचे जवळपास तीन महिने वाया गेले असून या कालावधीत झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी महामंडळाने व त्यांचे कर्मचारी यांनी पुढील महीने अतिरिक्त काम करून हा काल अपव्यय भरून काढण्याचा इरादा स्पष्ट केला आहे.

यापुढे महामंडळाची आणि पर्यटन स्थळांची प्रसिद्धीही देशी पर्यटकांना केंद्रस्थानी ठेवून करावी लागणार आहे. पर्यटकांना पर्यटन विषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहीती, आसपासच्या निसर्गाची माहीती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली, तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणार खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजनायांची माहीत वेबसाईट आणि Whats app ग्रुप च्या माध्यमातुन देण्यात येत आहे. शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची रिसॉर्ट खुली करण्यात आली असुन, व्यवस्थापकिय संचालक श्री. आशुतोष सलील यांच्या मार्गदर्शनाखाली पुनश्च पर्यटकांना अतिउत्ताम सेवा देण्यासाठी सज्ज आहेत-दिपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे.

Previous articleव्हाँट्सअप ग्रुप वरील आवाहनातून व्हेंटिलेटरसाठी भरघोस मदत
Next articleकोचिंग क्लासेस ला मान्यता न दिल्यास बेमुदत आमरण उपोषण