वखारीत युरिया टाकण्याने कांद्याचे नुकसान

प्रमोद दांगट,निरगुडसर : प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील शेतकरी सुभाष यशवंत वाळुंज यांनी आपल्या कांदा चाळीत साठवलेल्या कांदा पिशव्यावर अज्ञात व्यक्तीने युरिया टाकून कांद्याची नुकसान केल्याचा प्रकार घडला आहे.यात वाळुंज यांचा बराच कांदा काळा पडून खराब झाला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

शिंगवे येथे माळी मळ्यात शेतकरी सुभाष वाळुंज राहत असून त्यांनी यावर्षी आपल्या शेतीत कांद्याचे चांगले उत्पादन घेतले. काढलेला कांदा त्यांनी गावातील गणेश पंडित यांची कांदा चाळ भाड्याने घेऊन त्यात साठवला होता. मात्र काही दिवसांपूर्वी अज्ञात समाजकंटकांनी त्यांच्या कांदा चाळीत युरिया टाकून कांद्याचे नुकसान केले आहे. यात बराच कांदा खराब झाल्याने त्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कोरोना आजारामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे आता कुठे कांद्याला थोडा फार बाजारभाव वाढला असताना अश्या प्रकारच्या घटना घडल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

शेतकरी सुभाष वाळुंज यांच्या बाबतील मागील वर्षी ही अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या मागील वर्षी त्यांच्या उसाला अज्ञातांनी आग लावुन ,ठिबक संच ही पेटवून दिला होता.तर यावर्षीही त्यांनी चाळीत ठेवलेल्या कांद्यावर युरिया टाकून नुकसान केली आहे.या शेतकऱ्यांच्या बाबतीत अशा घटना वारंवार होत असून त्या अज्ञात व्यक्तीचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे

Previous articleअवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्यांवर घोडेगाव पोलिसांची कारवाई
Next articleसंविधानाचा अवमान केल्याप्रकरणी अभिनेते प्रवीण तरडे वर गुन्हा दाखल करण्याची मागणी