अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्यांवर घोडेगाव पोलिसांची कारवाई

प्रमोद दांगट : प्रतिनिधी

घोडेगाव (ता,आंबेगाव) पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोन वेगवेगळया केलेल्या कारवाईमध्ये ३५ हजार ३७७ रूपये किंमतीची देशी दारू व एक दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.

याबाबत घोडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस सहा.फौजदार कोंडाजी रेंगडे व पोलीस कॉन्स्टेबल अमोल काळे यांनी फिर्याद दिली आहे.दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस सहा फौजदार कोंडाजी रेगडे हे पेट्रोलिंग करत असताना चिंचोली कोकण्याची येथे एम.एच.४ जी.पी. ४८०३ दुचाकी वाहनावर संजय रंगनाथ चकवे ( वय ३२) रा.पारगाव ता.जुन्नर पुणे ,प्रकाश तुळशीराम मोजाड वय ४५ रा.सीतेवाडी ता.जुन्नर पुणे हे गाडीच्या मध्यभागी काहीतरी घेऊन चालले होते.पोलिसांना संशय आला असता व तपासणी केली असता त्यांच्याकडे १४,४०० रूपयांच्या किंमतीची मॅक्डोल कंपनीच्या दारूचे बॉक्स आढळून आले.पोलिसांनी यावर कारवाई करत दारू व २० हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त केली आहे.

तर घोडेगाव होळकर चौक येथे विजय गेनभाऊ लोहोट ( वय ३२ रा.गंगापूर बुद्रुक ता.आंबेगाव पुणे ) यांच्याकडे असलेल्या कापडी पिशवीतुन ९८८ किंमतीची जी एम संत्रा कंपनीच्या देशी दारू जप्त करण्यात आली. याबाबतची तक्रार पोलीस शिपाई अमोल काळे यांनी दिली आहे. सदर दारूची वाहतूक करणाऱ्यांवर घोडेगाव पोलिसांनी कारवाई केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous articleदौंड तालुक्यात गणपती बाप्पा ला शांततेत निरोप
Next articleवखारीत युरिया टाकण्याने कांद्याचे नुकसान